नाशिक : महाराष्ट्र पोलीस दलात पहिल्यांदाच  महिला पोलीसाला सर्वोत्कृष्ट पोलीस प्रशिक्षणार्थीचा  मान मिळाला. मीना तुपे या बीडमधील शेतकरी कुटुंबातील प्रशिक्षणार्थीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.   नाशकात आज महाराष्ट्र पोलिसांचा दीक्षांत समारंभ सोहळा  पार पडला. यावेळी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.   पोलीस उपनिरिक्षकांचा हा ११३ वा दीक्षांत समारंभ होता..नाशकातील पोलीस अकादमीच्या मैदानावर ७४९ प्रशिक्षित पोलीस निरीक्षकांचा दीक्षांत सोहळा पार पडला.   दरम्यान ८ प्लाटून्सच्या २८३ अधिकाऱ्यांनी दिमाखदार संचलन केलं. हा सोहळा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.