पुणे/तिरुअनंतपूरम: गेले काही दिवस आपण सर्वजण ज्याची वाट पाहत होतो, तो मान्सून अखेर केरळात दाखल झाला आहे. पुणे वेधशाळेने याबद्दलची अधिकृत घोषणा केली आहे.
कालपासून मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार होतं. सध्या केरळ आणि दक्षिण कर्नाटकाच्या सीमेपर्यंत हा मान्सून येऊन पोहचला आहे. आताची मान्सूनची वाटचाल पाहता आगामी 3 दिवसात मान्सून संपूर्ण केरळ व्यापेल, असंही भाकित वेधशाळेने व्यक्त केलं आहे. यानंतर एका आठवड्याच्या कालावधीत मान्सून राज्यातही डेरेदाखल होईल असं पुणे वेधशाळेने सांगितलं आहे.
त्यामुळे गेले काही दिवस दुष्काळामुळे पिचलेल्या राज्यातल्या शेतकऱ्याच्या दृष्टीने ही सर्वात महत्वाची आणि आनंदाची बाब असेल.