औषध घोटाळा : औषध खरेदीत 297 कोटींचा अपहार, युती सरकारवर आरोप
एबीपी माझा वेब टीम | 10 Apr 2016 06:18 AM (IST)
मुंबई : एकीकडे चिक्की घोटाळ्याचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना, राज्यातल्या युती सरकारवर आणखी एका घोटाळ्याचा आरोप होतो आहे. राज्यात 297 कोटींच्या औषधांची मनमानी पद्धतीने खरेदी करण्यात आल्याचं कळतं आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानाअंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने काही ठराविक औषधांसाठी निविदा मागवल्या होत्या. ज्याच्या खरेदीच्या जाहिराती मेघालय, शिलाँग, दिब्रूगड इथल्या वृत्तपत्रांमध्ये देण्यात आल्या आहेत.