लातूर : दारुच्या नशेसाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. एका वैद्यकीय अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याच्या नोकरीबद्दलच्या अहवालासाठी दारुच्या बाटल्या लाच म्हणून मागितल्याचा प्रकार लातुरात समोर आला आहे. दारुची लाच मिळाल्यानंतर तो अधिकारी त्याच्या मित्रांसह पार्टी करु लागला. ऐन पार्टीत रंग चढणार तेवढ्यात एसीबीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून आरोपीला रंगेहात पकडले.

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईत लाच म्हणून घेतलेला दारुचा खंबा आणि तीन बिअरच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. तसेच लाच मागितल्याप्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी भालचंद्र हरिहर चाकूरकर याला ताब्यात घेतले आहे.

आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला सन 2018 - 19 च्या कामाबाबतच्या अहवालात 'बी+' असा शेरा देण्यात आला होता. परंतु, याचा आपल्या नोकरीवर परिणाम होईल म्हणून या कर्मचाऱ्याने हा शेरा 'ए+' करण्याची मागणी निवळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वरिष्ठांकडे केली. यासाठी वैद्यकीय अधिकारी भालचंद्र चाकूरकर (वय 43) याने चक्क दारुच्या पार्टीची मागणी केली.

पुण्याचे तहसिलदार सचिन डोंगरे यांना 1 कोटींची लाच घेताना अटक | एबीपी माझा



त्या कर्मचाऱ्याने पार्टी देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याने एसीबीकडे तक्रारही केली. कर्माचाऱ्याच्या तक्रारीनुसार एसीबीच्या लातूर युनिटने भालचंद्र याला लातूर-औसा रोडवरील हॉटेल काश्मिर येथे लाचेच्या साहित्यासह ताब्यात घेतले.

1 कोटी 70 लाख रुपयांची लाच घेताना वकिलावर कारवाई | पुणे | एबीपी माझा