माथेरान : : माथेरानची राणी' म्हणून  ओळखलं जातं, ती मिनी ट्रेन (Mini Train)  लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पर्यटकांना पुन्हा एकदा या ट्रेन प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे.  माथेरान ते नेरळ ही  मिनीट्रेन सेवा नोव्हेंबरपर्यंत पुन्हा रुळावर येण्याची शक्यता आहे.  2019 मध्ये माथेरानमध्ये (Matheran) झालेल्या अतिवृष्टीमुळे नेरळ ते माथेरान दरम्यानच्या डोंगर भागातील रेल्वे रुळांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून  नेरळ-माथेरान मार्ग बंद होता, तर अमन लॉज ते बाजारपेठ मार्गावर शटल रेल्वे सुरू होती.  सध्या रेल्वे रुळ बदलण्याचे काम सुरु आहे. या कामाची पाहणी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी आणि विभागीय प्रबंधक सलग गोयल यांनी पाहणी केली आहे.


माथेरान येथील मिनिट्रेन हे पर्यटकांचे आकर्षण आहे. त्यातच, गेल्या सुमारे तीन वर्षांपूर्वी 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नेरळ ते माथेरान दरम्यानच्या डोंगर भागातील रेल्वे रुळांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे, या मार्गावरील रूळ बदलण्याचे काम सुरु होते. तर अमनलॉज ते माथेरान बाजारपेठ दरम्यान शटल सेवा सुरू ठेवण्यात आली होती. दरम्यान, नेरळ ते माथेरान मिनिट्रेन सेवा ही गेल्या तीन वर्षांपासून ठप्प असून रेल्वे रुळावरील स्लिपर बदलण्याचे काम हे जुमापट्टी स्थानकापर्यंत पूर्ण झाले आहे. 


त्यामुळे, या कामाची पाहणी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी आणि विभागीय प्रबंधक सलग गोयल यांनी भेट दिली. यावेळी, त्यांनी येत्या दोन ते तीन महिन्यातील नोव्हेंबरपर्यंत नेरळ - माथेरान दरम्यानची मिनिट्रेन सेवा सुरू करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर, माथेरानमधील शटल  सेवेच्या फेऱ्यांमध्ये दोन अधिकचे बोगी जोडण्यात येणार आहेत.  


मुंबईपासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर असलेले माथेरान हे मुंबई, पुणे, ठाणे, रायगड येथील पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. तर, राज्यातील  अनेक पर्यटक हे थंड हवेचे ठिकाणी असलेल्या माथेरानला हजेरी लावत असतात. यामध्ये, माथेरानचे निसर्गरम्य वातावरण घनदाट झाडी, घोडे हे चिमुरड्या बालकांपासून तरुण आणि वृद्धांचे आकर्षण बनले आहे.