अमर रहे… अमर रहे, शहीद मेजर कुणाल गोसावी अमर रहे.. भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम.. अशा गगनभेदी घोषणांनी पंढरपूर निनादून गेलं. यावेळी मोठ्या संख्येनं जनसागर लोटला होता. कुणाल यांच्या पार्थिवाला त्यांची पाच वर्षाची मुलगी उमंगनं मुखाग्नी दिला.
पंढरपुरजवळील वखारी इथं गोसावी कुटुंबीयांची शेती आहे. त्याठिकाणी अंत्यविधी सोहळा झाला. कुणाल गोसावी यांचं पंढरपुरात शिक्षण झालं. नऊ वर्षापूर्वी ते सैन्यात दाखल झाले होते. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, पाच वर्षाची मुलगी आणि दोन भाऊ आहेत. 26 नोव्हेंबर रोजीच ते कुटुंबीयांना भेटून ड्युटीवर रुजू झाले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांशी झुंज देताना मेजर कुणाल गोसावी यांना वीरमरण आलं.
तर नांदेड जिलह्यातल्या जानापुरीचे वीर सुपुत्र शहीद लान्सनायक संभाजी कदम याचं पार्थिव पार्थिव नांदेडमध्ये पोहोचलं आहे. नगरोटामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लान्सनायक संभाजी कदम धारातीर्थी पडले. जानापुरी गावात शहीद कदम यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे. शहीद लान्सनायक संभाजी कदमांच्या जाण्यानं जानापुरी गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई वडील, पत्नी, तीन वर्षाची मुलगी असा आप्त परिवार आहे.
संबंधित बातम्या
दहशतवादी हल्ल्यात पंढरपूरचे मेजर कुणाल गोसावी शहीद