मुंबई : 'आयएमएम'पाठोपाठ 'मार्ड'नेही संप मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. संप मागे घेत असल्याचं प्रतिज्ञापत्र मार्डने मुंबई हायकोर्टात सादर केलं आहे. उद्या म्हणजे शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत कामावर रुजू होण्याचं आश्वासन मार्डच्या वतीने वकिलांनी कोर्टात दिलं आहे.


डॉक्टर उद्या कामावर आले नाहीत, तर सरकार किंवा मुंबई महापालिका त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करेल, असा इशारा मुंबई हायकोर्टाने आंदोलक डॉक्टरांना दिला होता. त्यानंतर मार्डने सकाळी आठ वाजेपर्यंत कामावर रुजू होण्याचं आश्वासन कोर्टात दिलं आहे.

डॉक्टरांच्या संपामुळे 380 रुग्ण दगावले, वकिलांची हायकोर्टात माहिती


जर निवासी डॉक्टर कामावर येत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले होते. डॉक्टरांनी आडमुठेपणाची भूमिका सोडली नाही, तर आम्ही त्यांचं रक्षण करु शकणार नाही, असंही हायकोर्टाने ठणकावून सांगितलं होतं.

डॉक्टरांनी आठमुठेपणा कायम ठेवला, तर त्यांच्याबाबतीत आम्हाला आमचे निर्देश बदलावे लागतील. तुमच्या प्रतिनिधींनी कोर्टात हमी देऊनही कामावर रूजू होत नसाल, तर ते चुकीचं आहे, असं हायकोर्ट म्हणालं होतं.

यापूर्वी हायकोर्टाने संपकरी डॉक्टरांना जर मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा, अशा शब्दात खडसावलं होतं. त्यानंतर डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी संप मागे घेत असल्याचं हायकोर्टाला सांगितलं होतं. मात्र तरीही डॉक्टरांनी संप मागे घेतलेला नव्हता.

मुख्यमंत्र्यांचा दम

जनतेच्या पैशातून सरकारी डॉक्टरांच्या शिक्षणाचा खर्च होतो. त्याच जनतेला तुम्ही मरणाच्या दारात सोडणार असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. आज शेवटचं सांगतोय, हात जोडतो, कामावर परत या, शपथेला विसरु नका, देवाचा दर्जा दिलाय, दानव बनू नका, असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलक डॉक्टरांना दिला. मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा विधानसभेत डॉक्टरांच्या संपाबाबत निवेदन दिलं.

संबंधित बातम्या


ज्यांच्या पैशावर शिकता, त्यांना मरणाच्या दारात सोडू नका, मुख्यमंत्र्यांचा डॉक्टरांना सज्जड दम

मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा : हायकोर्ट

‘मार्ड’कडून संप मागे, डॉक्टरांना सेवेत रुजू होण्याचं आवाहन

कोर्टाच्या आदेशानंतरही डॉक्टर लेखी आश्वासनासाठी अडून

मुंबई हायकोर्टाने फटकारल्यानंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे

डॉक्टरांनो, तुम्हाला संरक्षण देऊ, पण समाजाला शिक्षा देऊ नका : मुख्यमंत्री

मार्डचे डॉक्टर चौथ्या दिवशीही सामूहिक रजेवर