Marathwada Rain: राज्यात आजपासून पुन्हा जोरधारांचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुढील तीन ते चार दिवस गुजरात किनारपट्टीवर घोंगावणाऱ्या चक्रीवादळाने राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान  विभागानं दिलाय. मराठवाड्यातही पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचं सांगण्यात आलंय. दरम्यान, आज मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याला जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.


गेल्या काही दिवसापासून मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस झाला. इतर विभागांच्या तुलनेत पावसाचा जोर तसा कमी होता. पण हलक्या ते मध्यम सरींची संततधार असल्यानं मराठवाड्यातील धरणांमधलं पाणी आता वाढू लागलंय. अरबी समुद्रातील चक्रीवादळाच्या सक्रीयतेने राज्यभर पुन्हा सुरु झाला असून मराठवाड्यातही मुसळधार पावसाची हजेरी लागणार आहे.


मराठवाड्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट?


मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाचे राहणार असून आज छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. नांदेडला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.


प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट राहणार असून मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर नांदेड, हिंगोली, परभणी, जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.


नांदेडमध्ये 'मुसळधारा'


हवामान विभागाने आज नांदेड जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिल्यानंतर रविवारी पहाटेपासून नांदेडमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. नांदेडमधील किनवट तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु असून तेलंगणा सीमेवरच्या शिवणी ते अप्पारावपेठदरम्यान असणारे नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. या भागात पूरसदृश्य परिस्थिती झाल्याने  शिवणी , अप्पारावपेठ , मलकजाम , कंचली , चिखली या गावांचा संपर्क तुटला . शिवाय पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शेतात घुसले .. त्यामूळे शेतीचे देखील नुकसान झाले आहे.


हिंगोलीतही जोरदार पावसाला सुरुवात


हिंगोली जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून संत धार पावसाने हजेरी लावली आहे काल उशिरा हिंगोली परभणी आणि नांदेड या तीन जिल्ह्यासाठी हवामान विभागाच्या वतीने जोरदार पावसाचा अंदाज दिला होता त्यानंतर विजांच्या कडकडाटासह रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे मागील आठ ते दहा दिवसापासून पावसाने दडी मारली होती. सर्वदूर पावसाने हजेरी लावल्यामुळे  हवेत कमालीचा गारवा पसरला आहे.


नांदेड-परभणीत वादळी वाऱ्यांचा पाऊस


हवामान खात्याने पावसाचा  इशारा दिला नंतर आज पहाटे पासून नांदेड शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसचे आगमन झाले या झालेल्या पावसामुळे सहस्त्रकुंड धबधबा प्रवहीत झालाय.


परभणीत पहाटेपासून सर्वत्र जोरदार पाऊस बरसतोय. मेघगर्जनेसह  परभणी शहरासह जिल्हाभरात हा पाऊस होतोय. अनेक दिवसानंतर सर्व दूर पाऊस बरसत असल्यामुळे रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे तसेच छोटे मोठ्या ओढ्यांना ही पाणी आलंय.. एकूणच पिकांनाही हा पाऊस दिलासादायक आहे.


हेही वाचा:


Weather Update: चक्रीवादळाने पुन्हा पाऊस वाढणार; आजपासून राज्यात मुसळधार, कोकणसह मध्य महाराष्ट्राला 'यलो अलर्ट'