Marathwada Cabinet Meeting: उद्धव ठाकरेंनी वॉटर ग्रीड प्रकल्पाची हत्या केली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 Marathwada Cabinet Meeting : मराठवाड्यात आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीचे लेटेस्ट अपडेट एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Sep 2023 02:17 PM
सिंचन विभागावर 14 हजार कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय: मुख्यमंत्री शिंदे

CM Shinde: सरकारमध्ये आलो त्यावेळी आम्ही दोघेच होतो. त्यावेळी वाहून जाणाऱ्या पाण्याच्या संदर्भात निर्णय घेतला. समृध्दी महामार्ग हा मराठवाड्याला होणार आहे  सिंचनानाचे महत्वाचे निर्णय घेतले आहेत. जायकवाडी टप्पा दोन, उजवा कलावा, फुलंब्री निर्णय झाला. 14 हजार कोटी रुपये सिंचन विभागावर खर्च करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे महणाले.

CM  Eknath Shinde: मराठवाड्याला न्याय देण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी ही बैठक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM  Eknath Shinde: मराठवाड्याला न्याय देण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी ही बैठक झाली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2016 मध्ये झाली होती.  मराठवाड्यात ताकद आहे. मोठी झेप घेणारा मराठवाडा आहे. काही लोक म्हणतात फक्त घोषणा होतात मात्र निर्णय होत  नाही. मात्र पहिल्या मंत्रीमंडळ पासून आतापर्यंत सर्वसामान्य डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले आहेत. 35 सिंचन प्रकल्प यांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. आठ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. 

Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंनी वॉटर ग्रीड प्रकल्पाची हत्या केली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis: बऱ्याच वर्षांनी मंत्रीमंडळ बैठक मराठवाड्यात होत आहे. ही बैठक होत असताना विरोधक पपक्षांनी  ही बैठक होऊ नये यासाठी प्रयत्न केला. मात्र जे काहीच करत नाही मात्र बोट ठेवण्याचा प्रयत्न असतो. 2016  मध्ये 31 विषय होते आणि 2017 मध्ये आढावा घेतली त्यावेळी 10 विषय पूर्ण झाले होत आता आढावा घेतल्यानंतर 23 विषय पूर्ण झाले आहे   वॉटर ग्रीड संदर्भात टेंडर काढले होते.  जे प्रश्न विचारात आहे त्या उद्धव ठाकरेंनी या योजनेची हत्या केली, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.  जे लोक मागच्या बैठकी संदर्भात विचारत होते त्याचे मी विश्लेषण दिलेले आहे. मराठवाड्याला प्राधान्य दिले आहे.

Kranti Chowk:  बंजारा समाजाचे पांढरे वादळ क्रांतीचौकात धडकले

Kranti Chowk:  क्रांतीचौकात बंजारा समाजाचा पांढरा वादळ मोर्चा धडकलाय. बंजारा समाजामध्ये इतर जातीचे लोक घुसखोरी करत आहेत. खासकरून भोजपुरी लोक बंजाराचे प्रमाणपत्र घेत आहेत. त्याविरोधात हा मोर्चा आहे. सरकारने एसआयटीची स्थापना करावी या मागणीसाठी बंजारा समाजातील महिलांनी पांढरे वादळ महामोर्चा काढला आहे

Adivasi Morcha: क्रांती चौकात आदिवासी समाजाचा मोर्चा, जातीचं प्रमाणपत्र मिळतत नसल्यानं मोर्चेकरी आक्रमक

Adivasi Morcha: क्रांती चौकात आदिवासी समाजाचा हातोडा मोर्चा धडकलाय. जातीचं प्रमाणपत्र मिळत नसल्यानं आदिवासी वेषभूषेत त्यांनी मोर्चा काढलाय. 

Hasan Mushrif: मुख्यमंत्र्यांनी विश्रामगृहात मुक्काम हलवल्यानंतर इतर मंत्रीही शासकीय विश्रामगृहात राहणार

Hasan Mushrif: मुख्यमंत्र्यांनी विश्रामगृहात मुक्काम हलवल्यानंतर इतर मंत्रीही शासकीय विश्रामगृहात राहणार असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे

CM Eknath Shinde:  मुख्यंमत्री एकनाथ शिंदेंची 2 वाजता पत्रकार परिषद 

CM Eknath Shinde:  मंत्रीमंडळ बैठकीनंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेची वेळ दुपारी 2  ची आहे. मंत्रीमंडळ बैठक आटोपल्यावर प्रत्यक्ष पत्रकार परिषद सुरु होईल, असे माहिती माहिती कार्यलयातून देण्यात आली आहे. 

CM Eknath Shinde In SambhajiNagar: मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री  संभाजीनगरमध्ये दाखल

CM Eknath Shinde In SambhajiNagar: मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री  संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगर विमातळावर दाखल झाले आहेत. 

Aurangabad News: औरंगाबादकरांनो आज घराबाहेर पडण्यापूर्वी वाहतुकीतील बदल पाहा

Aurangabad News:   औरंगाबाद शहरात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. सोबतच सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांच्या दौऱ्यासह मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवानिमित्त शहरातील प्रमुख रस्ते आज बंद राहणार आहेत. मंत्री मंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विविध आंदोलन आणि मोर्चे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाची बैठक सुरळीत पार पडावी यासाठी औरंगाबाद शहर पोलिसांनी शहरातील वाहतुकीत काही बदल केला आहे. (वाचा सविस्तर) 

Marathwada Cabinet Meeting: विरोधकांच्या टीकेनंतर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय बदलला

Marathwada Cabinet Meeting:  विरोधकांच्या घणाघाती टीकेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय बदलला आहे. आता ते सरकारी विश्रामगृहात मुक्काम करणार आहेत. या आधी ते रामा हॉटेलच्या आलिशान रुममध्ये राहणार होते. पण राज्य दुष्काळात होरपळत असताना मुख्यमंत्र्यांच्या फाईव्हस्टार हॉटेलमधील प्रस्तावित मुक्कामावर जोरदार टीका झाली होती.

उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव धाराशिव तर औरंगाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर, राजपत्र जारी

SambhajiNagar Cabinet Meeting: औरंगाबाद शहरानंतर जिल्ह्याचंही नावं आता बदलण्यात आलाय. यापुढे औरंगाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलंय. राज्य सरकारने काल रात्री याचं नोटिफिकेशन काढलंय. यात उस्मानाबाद जिल्ह्याचही नाव बदलण्यात आलंय. उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव आता धारशिव करण्यात आलंय. नामांतरबाबत मुंबई हायकोर्टात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान आलेल्या आक्षेपांची पडताळणी झालेली नसल्याने तूर्तास औरंगाबादचं नाव औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव उस्मानाबाद जिल्हा असंच ठेवायचं सरकारनं ठरवलं होतं. परंतु काल रात्री सरकारने नोटिफिकेशन काढून दोन्ही जिल्ह्याचे नाव बदललं.

पार्श्वभूमी

 Marathwada Cabinet Meeting :  मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या उपोषणामुळे सरकार जागं झालं.... अवघ्या सरकारी यंत्रणांची 17 दिवस या उपोषणानं झोप उडवली होती... मराठवाड्यातील मराठ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं गेलं... आणि त्यामुळेच मराठवाड्यात आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे... गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळाचा दाह सहन करणाऱ्या मराठवाडय़ाला आज मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण संभाजीनगरमध्ये होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत सुमारे 40 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने सिंचन, रस्ते विकास प्रकल्प, वैद्यकीय महाविद्यालय आणि कृषि महाविद्यालयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. याबाबत सिंचन विभागाचा सर्वाधिक 21 हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव सादर झाले आहेत. काही प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा समावेश असल्याचंही समजतंय.


मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय होण्याची शक्यता?


- मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प फोकस केला जाणार


- काही बंद पडलेले सिंचन प्रकल्प आहेत त्यांना भरघोस निधी दिला जाणार


- मराठवाड्यात सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात असल्याने सोयाबीन रिसर्च सेंटरची घोषणा होणार


- मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी मेडिकल आणि कृषी कॉलेजची घोषणा होणार


- मराठवाड्यात अनेक निजामकालीन शाळा आणि कार्यालय आहे त्यांच्या पुर्नविकासाठी निधीची तरतूद केली जाणार


- अनेक रस्त्यांची दूरवस्था आहे त्यांच काँक्रिटीकरण आणि नवीन पूल बांधले जाणार


- मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या वतीने मराठवाडा मुक्तिसंग्राम:वंदे मातरम मूव्हमेंट ही मराठवाड्याचा इतिहास सांगणार साहित्य प्रकाशन केलं जाणार आहे. 


 विरोधकांच्या घणाघाती टीकेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय बदलला आहे. आता ते सरकारी विश्रामगृहात मुक्काम करणार आहेत. या आधी ते रामा हॉटेलच्या आलिशान रुममध्ये राहणार होते. पण राज्य दुष्काळात होरपळत असताना मुख्यमंत्र्यांच्या फाईव्हस्टार हॉटेलमधील प्रस्तावित मुक्कामावर जोरदार टीका झाली होती. 


 संभाजीनगरमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी सर्व विभागाने हे प्रस्ताव पाठवले आहेत. या प्रस्तावात कोणते विषय मान्यतेसाठी घ्यायचे यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. ही या संदर्भात निर्णय घेऊन मंत्रिमंडळ बैठकीसमोर हे प्रस्ताव ठेवले जाणार आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.