कोल्हापूर : सकल मराठा समाजाकडून राजकीय पक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. आपल्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी मराठा समाजाने हा निर्णय घेतला आहे. कोल्हापुरात शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर सभागृहात पक्ष स्थापनेसंदर्भात मराठा समाजाचा मेळावा घेण्यात आला.
मराठा समाजाच्या अस्तित्वासाठी राजकीय पक्षाची गरज असल्याचे एकमत झालं आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रायरेश्वर मंदिरात नव्या पक्षाची स्थापना होणार आहे. त्यामुळे आपल्या मागण्या राजकीय मार्गाने पूर्ण करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे.
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने जवळपास 58 मूकमोर्चे काढण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत.
विविध मागण्यांसाठी मराठा समाज एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन आंदोलन केलं, तरीही त्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारने ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी मराठा समाजाने राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
संबधित बातम्या
मराठा समाजाशी सरकार चर्चेस तयार- मुख्यमंत्री
मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्या, राजू शेट्टी यांची लोकसभेत मागणी
घटनादुरुस्तीतून समाजाला खुश करण्याचा प्रश्नच नाही : पवार