Maratha Reservation : मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) भाजप खासदार संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा गाजणार असल्याची चिन्हे आहेत. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत सोमवारी मुंबई येथे पत्रकार परिषद घेणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी याआधीही मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं होतं. त्यानंतर राज्यभरात फिरुन त्यांनी दिग्गजांशी चर्चा केली. या सर्व घडामोडींनंतर संभाजीराजेंनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाबाबत ते सोमवारी खुलासा करणार आहेत. संभाजीराजे छत्रपती पुन्हा एकदा आंदोलन पुकारणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अनेक दिग्गजांच्या भेटी घेतल्या आहेत. राज्यभरातील अनेकांसोबत मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर त्यांनी चर्चा केली आहे. आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ट्विट करत याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. मराठ आरक्षणासाठी पुढील वाटचाल कशी असणार आहे याबाबतची दिशाही ठरवली आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका ते स्पष्ट करणार आहेत. संभाजीराजे छत्रपती यांच्या ट्विटनंतर ते नेमका कोणता मोठा निर्णय जाहीर करतात याबाबतच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती सोमवारी मोठा निर्णय घेणार असल्याचे समजतेय. 


संभाजीराजे छत्रपती यांचे ट्विट काय आहे?
“मराठा आरक्षण व समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्यांबाबत समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी विचार विनिमय करून मी माझी पुढील दिशा ठरविलेली आहे ; याबाबत उद्या, दि. 14 रोजी स. 11 वा. मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन ती स्पष्ट करणार आहे.”
 





मागील काही दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षण आणि इतर विविध मागण्यासाठी आक्रमक झाले होते. त्यांनी अनेकदा बैठकाही घेतल्या होत्या. पण सारथीची मागणीवगळता एकही मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता खासदार संभाजीराजे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.