Maratha Reservation Protest LIVE : जालन्यात पुढील दोन दिवस इंटरनेट सेवा बंद

Maratha Reservation Protest : मराठा आंदोलनाला आता अधिकच झळ बसू लागली आहे. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत आहे. मराठा आंदोलनाचे प्रत्येक अपडेट क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 31 Oct 2023 10:45 PM
Maratha Protest Nanded : नांदेडमध्ये रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामार्ग, राज्यमार्ग व इतर मार्गांवर उपोषण, धरणे, मोर्चे, रॅली आदी आयोजनावर निर्बंध

नांदेड :  जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय, सर्व राज्य महामार्गावर व इतर सर्व मार्गांवर वाहतूक आवा-गमन सुरळीत चालू राहण्याच्यादृष्टीने नमूद ठिकाणी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी पुढील आदेशापर्यंत उपोषणे, धरणे, मोर्चे, रॅली, रास्ता रोको, आंदोलने इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास, आयोजित करण्यास प्रतिबंध केले आहे. 

Jalna News : जालन्यात पुढील दोन दिवस इंटरनेट सेवा बंद

Jalna News : जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरु आहे. त्यातच आता पुढील दोन दिवस जालन्यातील इंटरनेट सेवा ही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Maratha Protest : इंदापूरमध्ये मराठा आंदोलकांचे अनोखे आंदोलन, जरांगे पाटलांच्या उपोषणाला दिला पाठिंबा 

Maratha Protest :  मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे या मागणी साठी इंदापूर मध्ये मराठा आंदोलनकांनी अनोखे आंदोलन केले. टॉवरवर चढत यावेळी या आंदोलकांनी आरक्षणाची मागणी केली. इंदापूर तालुक्यातील बावडा येथील घटना आहे. ओंकार घाडगे आणि सतीश डोके अशी या आंदोलकांची नावे आहेत. सध्या आंदोलस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

Maratha Protest : सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग मराठा आंदोलकांनी अडवला 

Maratha Protest : सोलापूर शहरातील बाळेजवळील फ्लायओव्हरवर टायर जाळून महामार्ग अडवण्यात आला. यामुळे पुण्याहून सोलापूरकडे येणारी वाहतूक पूर्णपणे थांबली. यावेळी मराठा आंदोलकांकडून एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी देखील करण्यात आली. 

Amit Shah : राज्यातील परिस्थितीवर अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद 

Amit Shah :  केंद्रीय गृह विभागाने राज्यात मराठा आरक्षणावरून उपस्थित झालेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील परिस्थितीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची  माहिती सूत्रांनी दिली. 

Maratha Protest : ओबीसी नेत्यांना राज्य सरकार सुरक्षा पुरवणार, कॅबिनेट बैठकीत देवेंद्र फडवणीस यांचं आश्वासन

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ओबीसी नेत्यांना राज्य सरकार सुरक्षा पुरवणार, कॅबिनेट बैठकीत देवेंद्र फडवणीस यांचं आश्वासन,राज्यातील ओबीसी नेते आणि मंत्र्यांचा यामध्ये समावेश,गृह खात्याकडून खबरदारीचा उपाय म्हणून इंटेलिजन्सच्या मदतीने हल्ले रोखण्यावरही प्रयत्न होणार, महत्वाच्या ओबीसी नेत्यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यासंदर्भात कॅबिनेट सकारात्मक

Manoj Jarange protest : उद्धव ठाकरे यांचा मनोज जरांगे यांना फोन

माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवरुन बातचीत केली. उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली. तसंच मनोज जरांगे यांनी प्रकृतीची काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फोन करुन जरांगेंशी संवाद साधला.

पंतप्रधान ऐकणार असतील तर मराठा आरक्षणासाठी त्यांची भेट घेण्याची तयारी : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे 


घटनेनुसार निर्णय घेतला जाईल यावर मला विश्वास आहे. 31 डिसेंबरला अपात्र सरकारला आपण निरोप देऊ अशी मला खात्री आहे.


मराठा आरक्षण


काल बैठक घेतली त्यात दोन उपमुख्यमंत्री गैरहजर होते. एक उपमुख्यमंत्री रायपूरला गेले होते एक उपमुख्यमंत्री आजारी आहेत.


जरांगे पाटील यांना विनंती आहे की टोकाचं पाऊल उचलू नका तुमच्यासारख्या लढवय्याची राज्याला गरज आहे. जे जाळपोळ करतायत त्यांना महाराष्ट्राला बदनाम करायचं आहे. जेणेकरून उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये येणार नाही आणि हे उद्योगधंदे गुजरातला नेतील.


मुख्यमंत्री यांनी शपथ घेतली ती दीडवर्षांनंतर का घेतली? तुम्ही मार्ग काढा आम्ही तुमच्यासोबत आहोत आम्हाला बोलण्याची पण गरज नाही.


सर्व समाजाच्या अधिकाराला धक्का न लावता आरक्षण मराठा समाजाला द्यावे. लोकसभेमध्ये हा विषय गेला तर हा विषय सोडवला जाऊ शकतो. 
विशेष अधिवेशन बोलवून प्रश्न सोडवला जात असेल तर जरूर बोलवा. 31 डिसेंबरनंतर त्यांना माहितीये अपात्र ठरणार आहे त्यामुळे हे आता राजीनामा देताय. 


राजीनामा देऊन काही उपयोग होणार नाही. पंतप्रधान यांचा कर्तव्य आहे की राज्यात काय सुरू आहे याकडे लक्ष द्यावे.जेव्हा केंद्राची कॅबिनेट बैठक होईल तेंव्हा राज्यातील केंद्रीय मंत्र्यांनी मराठा आरक्षण विषय कॅबिनेटमध्ये मांडावा. 


6-7 मंत्र्यांनी राज्यातील अस्वस्थेबद्दल बोलावं आणि राजीनामा देण्याची तयारी दर्शवावी. जर पंतप्रधानवर यावर परिणाम होणार नसेल तर सर्व 48 खासदारांनी राजीनामा द्यावा. महाराष्ट्र एकजुटीची हीच वेळ आहे 


पंतप्रधान ऐकणार असतील तर मराठा आरक्षणासाठी त्यांची भेट घेण्याची तयारी 

उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद, मराठा आंदोलन आणि आमदार अपात्रता प्रकरणावर भाष्य

उद्धव ठाकरे काय म्हणाले? 
 


व्यथित मनाने आज संवाद साधतोय. देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि दुसरा विषय मराठा आरक्षण.


सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल काल दिला, देशाची लोकशाही टिकणार आहे की नाही याकडे सगळ्या लोकांचे लक्ष आहे. सर्वोच्च न्यायालायकडे सर्वांचं लक्ष आहे. आता लवाद हे निर्देश आदेश मानणार आहे की नाही? राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला तो एकदा वाचून दाखवतो
हा आदेश जनतेला कळला पाहिजे. मी सर्व आमदारांना सांगतो राहुल नार्वेकर यांना काय आदेश दिले हे त्यांना वाचून दाखवावा ते जर मुंबईत असतील तर

Nanded Maratha protest : नांदेडमधील अनेक भागात रास्ता रोको

नांदेड : जिल्ह्यातील अनेक भागात रास्ता रोको , नायगांव शहर कडकडीत बंद , मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर टायर जाळत रस्ते केले वाहतुकीसाठी बंद, रस्ते बंद करत जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा.

बुलढाणा जिल्ह्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या 70 बस फेऱ्या रद्द

मराठा आंदोलनाला आता तीव्र स्वरूप प्राप्त होत असून अनेक ठिकाणी एसटी बसची तोडफोड आणि जाळपोळ केली जात असल्याच्या घटना घडत आहेत.. बुलढाणा जिल्ह्यातील विविध आगारातून 70 पेक्षा जास्त बस फेऱ्या ह्या मराठवाड्यात होत असतात, मात्र परिवहन महामंडळाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पुणे, छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर, बीड, अंबड, लातूर, नांदेड याठिकाणी जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या आजपासून रद्द केल्या आहेत, यामुळे एसटी महामंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागणार असून प्रवाशांचे देखील हाल होणार आहेत

Abdul Sattar Maratha protest : अब्दुल सत्तारांची गाडी मराठा- मुस्लिम तरुणांनी अडवली

छ.संभाजीनगर येथे मराठा आंदोलक आणि मुस्लिम तरुणांनी सत्तार यांची गाडी आडवली, सिल्लोड तालुक्यातील निमखेडा आणि टाकळी गावादरम्यान सत्तार यांचा चालक गाडी घेऊन जाताना आंदोलकांनी गाडी  आडवली. सरकारविरोधी घोषणा करत आंदोलकांनी गाडीवरील विधानसभेचा लोगो काढून आपला संताप व्यक्त केला.चालक घेऊन जात असलेल्या या गाडीत अब्दुल सत्तार नव्हते

Maratha Protest Parbhani : मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाने परभणी जिल्हा ठप्प, शहरात 3 तर जिल्ह्यात 10 पेक्षा जास्त ठिकाणी रास्ता रोको आंदोलन 

मराठा समाजाला आरक्षण मिळावं तसेच मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आंदोलनाला पाठिंबा म्हणून परभणी जिल्ह्यात जवळपास 13 ठिकाण पेक्षा जास्त ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यामुळे परभणी जिल्ह्यात ठप्प झाला आहे परभणी शहरात परभणी वसमत परभणी गंगाखेड आणि परभणी पाथरी या तीन प्रमुख महामार्गांवर मराठा समाजाचे आंदोलन मोठ्या प्रमाणावर रास्ता रोको करतायेत तसेच जिल्हाभरातील जवळपास दहा ठिकाणी वेगवेगळे महामार्ग आडवण्यात आलेले आहेत त्यामुळे जिल्हाभरातील वाहतूक ही ठप्प झालेली आहे सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे हे सर्व आंदोलन मागच्या एक तासांपेक्षा जास्त काळापासून सुरू आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्वतः पोलीस अधीक्षक आर रागसुधा तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या सह सर्व डीवायएसपी पोलीस निरीक्षक हे आंदोलन स्थळी थांबलेले आहेत

CM house security : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त 

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ-दीप निवासस्थानी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात जरंगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. अनेक आमदार आणि खासदारांच्या निवासस्थानी जाळपोळ देखील करण्यात आलीय. त्याच अनुषंगाने ठाण्यातील वागळे इस्टेट पोलिसांच्यावतीने शंभर शंभर मीटरचा अंतरावर बॅरिगेट लावून मोठा पोलीस फाटा वाढवण्यात आलेला आहे  

Maratha protest Beed update : बीडमध्ये तोडफोड सुरूच, वडवली बाजार समितीचं कार्यालय फोडलं

बीड (Maratha protest Beed update) : वडवनी तहसील कार्यालय आणि बाजार समितीमध्येही रात्री उशिरा जमावाने केली तोडफोड. 
माजलगाव आणि बीडनंतर रात्री उशिरा वडवली शहरातील तहसील कार्यालय आणि वडवली बाजार समितीमध्ये सुद्धा जमावाने मोठी तोडफोड केली यावेळी घोषणा देत आलेल्या जमावाने कार्यालयातील फर्निचरची मोठी नासधूस केली आहे.

Manoj Jarange : आरक्षण मिळेपर्यंत आमदार-खासदारांनी मुंबईत थांबावं : मनोज जरांगे

मनोज जरांगे काय म्हणाले? 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आरक्षणाबाबत चर्चा झाली. आपण त्यांना स्पष्टपणे सांगितले, नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाही.आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही, हे त्यांना स्पष्ट सांगितले. आम्ही अभ्यासकांची बैठक बोलावली आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा 2004 चा GR दुरुस्त करा. शेतीच्या आधारावरच आरक्षण दिलेले आहे. कितीही बहाणे सांगितले तरी आम्ही ऐकणार नाहीत. समितीकडे भरपूर पुरावे आहेत. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. 60 -65 टक्के मराठा समाज अगोदरच obc मध्ये आहे, आम्ही थोडे राहिलेलो आहोत. विशेष अधिवेशन घ्या. ज्याचा कुणबी प्रमाणपत्राला विरोध आहे त्यांनी घेऊ नका. शेतीची लाज वाटण्याएवढे मराठे खालच्या पातळीवर नाहीत. 


मारठवड्यात कागदरपत्र जमा करा आणि सर्व महराष्ट्राला आरक्षण द्या. विशेष अधिवेशन घ्या,समितीचा प्रथम अहवाल स्वीकारून तिला राज्याचा दर्जा द्या. कालपासून मी पाणी पितोय, मी पाणी पिल्यानंतर समाज शांत होणार असेल तर मी पाणी पिणार. मी पुन्हा सांगतो उद्रेक करू नका, आत्महत्या करू नका. खांद्याला खांदा लावून लढा. पाण्यामुळे तब्येत चांगली झालीय, उठून बसलोय. सगळीकडे शांततेत उपोषण सुरू आहे.आमरण उपोषण जसे सहन होईल तसे करा, मात्र साखळी उपोषण सुरू ठेवा. 


आपण सर्वांनी मुंबईत जाऊन आवाज उठवा असे म्हटले होते, बहुतेक आमदार मुंबईकडे गेलेत,  राजीनामा देण्याचं कळत नाही,सर्व आमदार खासदार मुंबईकडेच रहा. राजीनामा दिल्याने काय फायदा होतो कळत नाही पण सर्वांनी मुंबई सोडायची नाही. 


मराठा समाजने संयम राखावा, थोडं टप्प्या टप्प्यात होऊ द्या, बंदचा विचार तूर्तास करू नये, दरम्यान हा निर्णय समाजाचा आहे.

Maratha Protest Pune : पुण्यात मुस्लिम धर्मीयांचा जरांगेंना पाठिंबा, एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण

मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत, राज्यभरातून जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा मिळत आहे. 
पुण्यात कोंढव्यामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने जरांगे पाटील यांच्या उपोषणाला जाहीर पाठींबा दिला जात आहे व एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं जातं आहे. कोंढवा मध्ये ज्योती चौकात लाक्षणिक उपोषण केलं जातं आहे 

Sambhaji Nagar Bus service : संभाजीनगरमध्ये सोमवारी दुपारपासून बस सेवा ठप्प

संभाजीनगरमध्ये सोमवारी दुपारपासून बस सेवा ठप्प,  खबरदारीचा उपाय म्हणून 1400 रोजच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या, आतापर्यंत 20 लाख रुपयांचे नुकसान, पोलिसांच्या पुढील सुचनेनंतर सुरू होणार बससेवा

मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली, थरथरत्या अंगाने जरांगे म्हणाले, अर्धवट आरक्षण घेणार नाही, एकनाथ शिंदेंना थेट सांगितलं!

नोज जरांगे काय म्हणाले? 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आरक्षणाबाबत चर्चा झाली. आपण त्यांना स्पष्टपणे सांगितले, नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाही.आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही, हे त्यांना स्पष्ट सांगितले. आम्ही अभ्यासकांची बैठक बोलावली आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा 2004 चा GR दुरुस्त करा. शेतीच्या आधारावरच आरक्षण दिलेले आहे. कितीही बहाणे सांगितले तरी आम्ही ऐकणार नाहीत. समितीकडे भरपूर पुरावे आहेत. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. 60 -65 टक्के मराठा समाज अगोदरच obc मध्ये आहे, आम्ही थोडे राहिलेलो आहोत. विशेष अधिवेशन घ्या. ज्याचा कुणबी प्रमाणपत्राला विरोध आहे त्यांनी घेऊ नका. शेतीची लाज वाटण्याएवढे मराठे खालच्या पातळीवर नाहीत. 

Beed NCP Office : बीडच्या राष्ट्रवादी भवनातील सगळं साहित्य जळून खाक

Beed NCP Office : माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराची काल जाळपोळ करण्यात आली. त्यानंतर मराठा आंदोलकांनी शरद पवार गटाकडे असलेल्या राष्ट्रवादी भवनाच्या इमारतीला आग लावली. दरम्यान राष्ट्रवादी भवनातील सगळं साहित्य जळून खाक झालंय.. 

Beed बीडमधील शिंदे गटाचे शिवसेना शहरप्रमुख कुंडलिक खाडे यांचं कार्यालय मराठा आंदोलकांनी जाळलं

Beed :  बीडमध्येही मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. बीडमधील शिंदे गटाचे शिवसेना शहरप्रमुख कुंडलिक खाडे यांचं कार्यालय मराठा आंदोलकांनी जाळलं. 

Beed Curfew: बीडमध्ये संचारबंदी; अत्यावशक सेवेत कार्यरत असलेल्या लोकांनी बाहेर पडा, पोलिसांचे आवाहन

Beed Curfew:  बीडमध्ये संचारबंदी असल्याने फक्त अत्यावशक सेवेत कार्यरत असलेल्या लोकांनाच घराबाहेर पडण्याची परवानगी नाही.  मात्र तरीही घराबाहेर पडलेल्या अन्य सेवेतील नागरिकांना परत घरी जाण्याचं पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे. 

पार्श्वभूमी

मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) गेल्या सात दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची प्रकृती खालावत आहे.  मराठा आंदोलकांच्या आग्रहामुळे जरांगे आजपासून पाणी पिणार आहे.  मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation)   राज्यभरात  मराठा आंदोलक आक्रमक झाला आहे.  मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्यात.  उग्र आंदोलन होत असल्याने आंदोलकांच्या आग्रहाने ते पाणी घेणार आहे. पाणी घेत नसल्याने तब्येत खालावत असल्याने आंदोलक हिंसक होत असल्याने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी निर्णय घेतला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.