Maratha Reservation Protest : मराठ्यांना आरक्षण मिळेल, पण घाई गडबडीत निर्णय नको; सरकारच्या समितीचे मनोज जरांगेंना आवाहन
Maratha Reservation Protest : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंशी चर्चा करणार आहे.
Maratha Reservation : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र का देऊ शकत नाही? जरांगेंचा न्यायमूर्तींना सवाल
Maratha Reservation : मराठा समाजाला टिकाणारं आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरु - न्यायमूर्ती
Maratha Reservation : निवृत्त न्यायाधीशांकडून जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न
Maratha Reservation : मराठ्यांना नक्की आरक्षण मिळेल, न्यायमूर्तींनी जरांगेंना दिला विश्वास
Manoj Jarange : घाईमध्ये कोणताही निर्णय नको - न्यायमूर्तीं
Manoj Jarange : घाईमध्ये कोणताही निर्णय नको - न्यायमूर्तीं
Manoj Jarange : सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवली सराटीमध्ये पोहचले आहे.
राज्य सरकारचे शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल झालं असून ते आता जालन्याच्या दिशेने रवाना झालं आहे. काही वेळातच ते मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे.
Maharashtra Maratha Protest: सरकारचं शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल झालंय.. थोड्याच वेळात जालन्यात दाखल होईल.. शिष्टमंडळात तिन्ही पक्षातला एक मंत्री असणार आहे.. अजित पवारांच्या गटातून कृषीमंत्री धनंजय मुंडे, शिंदेंच्या शिवसेनेतून उद्योगमंत्री उदय सामंत आणि भाजपचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे विशेष विमानानं जालन्यात पोहोचणार आहेत... शिष्टमंडळात दोन निवृत्त न्यायमूर्तींचाही समावेश आहे...
Mantralay Andolan: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदारांचे मंत्रालयात आंदोलन करण्यात येत आहे. सर्वपक्षीय आमदारांचं आज तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरू आहे.
सर्वपक्षीय आमदारांनी रास्तारोको केला आहे. आरक्षण मिळेपर्यंत माझा पक्षच नाही, अशी प्रतिक्रिया आमदार राजू नवघरे यांनी दिली आहे.
Solapur Maratha Protest: सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करत रास्ता रोको करणाऱ्या नऊ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. काल दुपारी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन केले होते. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दहा मराठा आंदोलक विरोधात गुन्हा दाखल झाला होता . त्यानंतर रात्री उशिरा नऊ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. आज दुपारी अटक केलेल्या कार्यकर्त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
Nandurbar Maratha Protest: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेडमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागलंय, त्यामुळे आतापर्यंत पन्नास आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 41 आंदोलक हे तिशीच्या आतले असून त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे हे गंभीर आहेत. या 41 युवकांना भविष्यात शासकीय नोकरी मिळवणे किंवा विदेशात जाण्यासाठी लागणारा पासपोर्ट मिळणं अवघड असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलंय.
Parbhani Letter: राज्यभरातून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे मनोज जरांगे पाटील हे गेल्या नऊ दिवसापासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहे त्यामुळे राज्यभरातून मराठा समाजातील युवक अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या भेटीला येत आहेत कोल्हापूर व सातारा येथून आलेल्या युवकांनी जरंगे पाटलांना चक्क रक्तांनी लिहिलेल्या पत्रातून साथ घातली आहे तर काही युवकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने लिहिलेल्या पत्रातून आरक्षणाची मागणी केली आहे
Nandurbar Maratha Protest: नंदुरबार तालुक्यातील उमर्दे येथील गुलाबराव मराठी हे 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या गावात आमरण उपोषणाला बसले आहेत. आमरण उपोषणामुळे पाटील यांची प्रकृती खालावली आहे.
Solapur Maratha Protest: सकल मराठा समाजाच्या वतीने सोलापुरातील अक्कलकोट इथे रास्ता रोको करण्यात येत आहे. सोलापूर-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग मराठा आंदोलकांनी रोखला. आंदोलकांनी रस्ता अडवल्याने दोन्हीकडील वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणारे भाविक वाहतूक कोंडीत अडकले आहेत.
Maratha Protest: देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे गृहमंत्री अमित शाहांची भेट घेणार आहे. आज दुपारी 3.30 वाजता घेणार भेट आहे. मराठा आरक्षणासंदर्भात चर्चेसाठी भेट घेणार आहेत.
Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांच्याकडे शिष्टमंडळ जाण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्ष निवासस्थानी बैठक पार पडणार आहे. त्यानंतर शिष्टमंडळ जालनाकडे रवाना होणार आहे.
पार्श्वभूमी
Maratha Reservation Protest : राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंशी चर्चा करणार आहे. सकाळी 10 वाजता जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी रवाना होणार आहे. जरांगे पाटील यांना सर्वपक्षीय नेत्यांच्या ठरावाची प्रत देणार आहे. सरकारला वेळ देण्याची शिष्टमंडळ मागणी करणार आहे. ओबीसी आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, आमदार नारायण कुचे यांचा शिष्टमंडळात समावेश शिष्टमंडळात कायदेतज्ज्ञांचाही समावेश आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -