Sambhajiraje Chhatrapati : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात काल पोलिसांनी गोळ्या झाडल्या. आंदोलकांवर लाठीचार्ज केला, या घटनेबद्दल मी सरकारचा निषेध करत असल्याचे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी केलं. ज्या माणसानं अंतरवाली सराटी गावात हे कृत्य करण्याचे आदेश दिलेत, त्याचं निलंबन झाल्याशिवाय मी गप्प बसणार नसल्याचे संभाजीराजे म्हणाले. मराठ्यांवर गोळी घालायची असेल तर पहिली गोळी माझ्यावर घाला असेही संभाजीराजे म्हणाले.


सरकारनं या घटनेचं स्पष्टीकरण द्यावं


काल जालन्यात सरकारच्या माध्यमातून हे अमानुष कृत्य घडवल्याचे संभाजीराजे म्हणाले. मी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाजार यांचा वंशज म्हणून इथं आलो आहे. पहिल्यांदा छत्रपती शाहू महाजांनी आरक्षण दिले होते. मराठा समाजावर अन्याय होत असल्यानं मी अनेक दिवसापासून लढत आहे. 2016 मध्ये मराठा समाजाचे शांततेत 58 मोर्चे निघाले. याचे साक्षीदार जग आहे. पण काल जे घडलं ते सरकारच्या माध्यमातून अमानुष कृत्य घडवल्याचे संभाजीराजे म्हणाले. शिवाजी महाराजांच्या, शाहू महाराजांच्या राज्यात असे होत असल्याचे संभाजीराजे म्हणाले. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन तुम्ही सरकार चालवता आणि दुसऱ्या बाजूला आंदोलकांवर गोळ्या झाडता. हे काय मोगलांचं, निजामांचे राज्य आहे का? असा सवाल संभाजीराजेंन उपस्थित केल. असं जर होत असेल तर शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचा वंशज म्हणून सांगतोय की, मराठ्यांवर गोळी घालायची असेल तर पहिली गोळी संभाजीवराजेंवर घाला असे ते म्हणाले. जर आंदोलकांवरचे गुन्हे सरकारनं मागे घेतले नाहीत आणि ज्या माणसाने हे कृत्य करण्याचे आदेश त्याचं निलंबन झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असे संभाजीराजे म्हणाले. निलंबन हा एक भाग झाला याचे सरकारनं स्पष्टीकरण द्यावे असे संभाजीराजे म्हणाले. 


आणखी किती दिवस आरक्षणाचा लढा द्यायचा? 


तुमचे सरकार दिल्लीत आहे, महाराष्ट्रात आहे, आम्हाला सांगा आणखी किती दिवस आरक्षणाचा लढा द्यायचा  असेही संभाजीराजे म्हणाले. आम्हाला आरक्षण कसे देणार ते पहिलं सांगा असेही ते म्हणाले. आंदोलकांवर गोळ्या घालायला हे काय पाकिस्तानचे लोक आहेत का? ते काय दहशतवादी आहेत का? असे सवाल संभाजीराजेंनी केले. आंदोलन करणारी सगळी लोकं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची असल्याचे ते म्हणाले. मी कधीही राजकारण केलं नाही मी समाजकारण केलं आहे. गरीब मराठा समाजाला कधी न्या मिळवून देणार हे पहिलं सांगा असे संभाजीराजे म्हणाले. 


गोळ्या झाडणं चूक की बरोबर?


आणखी तुम्ही किती समित्या करणार ते सांगा. या समितीच्या किती मिटिंग झाल्या ते सांगा असे संभाजीराजे म्हणाले. काल गृहमंत्री म्हणाले की, गोष्ट गंभीर आहे. यामध्ये पोलिसांची काही चूक नाही. गोळ्या झाडणं चूक की बरोबर असा सवाल सभाजीराजेंनी देवेंद्र फडणवीसांना केला. 


महत्त्वाच्या बातम्या:


सरकारचं चुकलंच! जालन्यातील घटनेला गेल्या 20 वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण जबाबदार , राज ठाकरेंकडून निषेध