Maratha Reservation Protest : मराठा आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर नेते, मंत्री, आमदारांच्या बंगल्याबाहेर पोलीस सुरक्षा वाढवली

राज्यभरामध्ये मराठा आरक्षणासाठी मोर्चे, राजीनामास्त्र, नेत्यांना बंदी त्याचबरोबर काळे झेंडे दाखवणे हा चांदा ते बांदा कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकारला आता तातडीने निर्णय घ्यावा लागणार आहे.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 31 Oct 2023 08:35 AM
Maratha Protest: मराठा आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर नेते, मंत्री, आमदारांच्या बंगल्याबाहेर पोलीस सुरक्षा वाढवली

Maratha Protest: मराठा आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर नेते, मंत्री, आमदारांच्या बंगल्याबाहेर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे.  काल बीडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि नेते जयदत्त क्षीरसागर यांचे बंगले जाळले.  शिवाय आमदार प्रकाश सोळंके यांचाही बंगला आंदोलकांनी जाळला. 

11 हजार 530 जणांना उद्यापासून कुणबी दाखले

ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना दाखले देणार आहोत. याबाबत तहसीलदारांची बैठक घेऊन उद्यापासूनच दाखले द्यायला सुरू करणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 

आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक, गाड्याही जाळल्या 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगावमधील घरावर दगडफेक करण्यात आली आहे. मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange Patil) संदर्भात सोळंकेंनी काल वक्तव्य केलं होतं. आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यामधून धुराचे लोट येत असल्याचं दिसत आहे. 

Nashik News : नाशिकमध्ये मराठा बांधव आक्रमक, निफाडच्या भरवस फाट्यावर जनआक्रोश, जय शिवरायच्या घोषणांनी परिसर दणाणला! 

Nashik News : नाशिकच्या निफाड तालुक्यातील भरवस फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. याच ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण सुरू असून मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी भरवस येथील तरुण आमरण उपोषणाला बसलेला आहे आणि या तरुणाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरल्याचं दिसून येत आहे.

जरांगे पाटलांना भेटण्यासाठी निघालेल्या उदयनराजेंची यू टर्न घेत पुण्याला कलटी

जालन्यातील आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी निघालेल्या उदयनराजे भोसले यांनी अचानक यू टर्न घेतला आहे. उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या निर्णयाने भूवया उंचावल्या असून चर्चेलाही उधाण आलं आहे. उदयनराजे यांनी आता पुण्यात थांबा घेतला आहे. 

Maratha Reservation : अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर आंदोलकांची दगडफेक

Maratha Reservation : बीड : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांची दगडफेक. जरांगेंच्या संदर्भात सोळंकेंनी काल वक्तव्य केलं होतं. मागील एक तासापासून दगडफेक होत आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यामधून धुराचे लोळ येत असल्याचं दिसत आहे. 

Maratha Reservation : मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात सर्व तहसीलदारांची उद्या बैठक

Maratha Reservation : मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात सर्व तहसीलदारांची उद्या बैठक होण्याची शक्यता


उप समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्याची शक्यता


मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र कसे द्यायच यासंदर्भात या बैठकीत चर्चा केली जाणार

Maratha Reservation: परभणीत तहसीलदार रणजित सिंह कोळेकर यांची गाडी फोडली 

Parbhani Maratha Reservation Updates : परभणी : तहसीलदार रणजित सिंह कोळेकर यांची गाडी फोडली 


परभणीच्या मानवत तालुक्यातील मानोली येथील घटना 


मराठा आरक्षणासाठी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून सुरू आहे आंदोलन


आंदोलन कर्त्यांना भेटण्यासाठी गेले होते मानवतचे तहसीलदार 


गावातील काही तरुणांशी बाचाबाची झाल्याने घडला प्रकार


गावात पाथरी चे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या सह पोलीस पथक दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाला आरक्षण मिळणार : संजय राठोड

Maratha Reservation : यवतमाळ : मराठा समाज हा आरक्षणासाठी आक्रमक झाला असून मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे, अशी घोषणासुद्धा होऊ शकते अशी प्रतिक्रिया पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाला आरक्षण मिळणार : संजय राठ

Maratha Reservation : यवतमाळ : मराठा समाज हा आरक्षणासाठी आक्रमक झाला असून मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे, अशी घोषणासुद्धा होऊ शकते अशी प्रतिक्रिया पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. 

Maratha Reservation : मराठा आरक्षण उप समितीची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार

Maratha Reservation : मराठा आरक्षण उप समितीची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार


या बैठकीत काय काय आढावा झाला याची माहिती देतील त्यानंतर  नवीन घोषणाही करण्याची शक्यता

Maratha Reservation: शिवसेना शिंदे गटातील मराठवाडातील आमदारांचं शिष्ठमंडळ आज मुख्तमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार

Marathwada Maratha Reservation:  मराठवाड्यात मराठा आरक्षणच्या संदर्भात वातावरण संतप्त असताना अनेक आमदाराना आणि खासदारना गावबंदीचा सामना करावा लागत आहे. आज  शिवसेना शिंदे गटातील मराठवाडातील आमदारांचं शिष्ठमंडळ आज मुख्तमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.  मराठा समाजाला आरक्षण कसं मिळू शकणार यावर तोडगा काढण्याची मागणी करण्यात येणार आहे. आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात 7 आमदारांचं शिष्ठमंडळ हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

Maratha Protest:  महसूलमंत्री विखे पाटलांच्या मतदारसंघात मराठा समाज आक्रमक

Maratha Protest:  महसूलमंत्री विखे पाटलांच्या मतदारसंघात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह प्रधानमंत्र्यांच्या फोटोला काळे फासले. एसटी बस वरील जाहिरातीच्या फोटोला काळे फासले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोलाही काळे फासले. शिर्डी मतदारसंघातील राहाता तालुक्यात मराठा तरुण उतरले रस्त्यावर उतरले आहे. 

खासदार उदयनराजे भोसले मनोज जरांगेची भेट घेणार

खासदार उदयनराजे भोसले आज आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. संभाजीराजे यांनीही यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. 

Hingoli : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तीनही आगारातील बस सेवा ठप्प

हिंगोली : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन होत असताना अनेक ठिकाणी परिवहन विभागाच्या बस जाळणे, त्याचबरोबर बसची तोडफोड यामुळे परिवहन विभागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हे लक्षात घेता परिवहन विभागाच्यावतीने हिंगोली जिल्ह्यातील तीनही आगारातून सोडण्यात येणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. तीनही आगारातील जवळपास 300 हून अधिक बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे याचा फटका प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसतोय. आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या त्याचबरोबर इतर सर्व बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बस स्थानक परिसरामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय. 

नाशिकमधूनही मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी फेऱ्या रद्द

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनाचा परिणाम राज्यातील एसटी महामंडळावर झाला आहे. नाशिकमधून मराठवाड्यातील एसटीच्या सगळ्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. नाशिकमधूनही मराठवाड्याकडे जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पार्श्वभूमी

Maratha Reservation Protest Across Maharashtra Live Updates : मराठा समाजाचे नेते म्हणून जरांगे आणि दुसऱ्यांदा मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारल्यानंतर आता राज्यभरातून मराठा आरक्षणासाठी अक्षरशः वणवा पेटला आहे. राज्यभरामध्ये मराठा आरक्षणासाठी मोर्चे, राजीनामास्त्र, नेत्यांना बंदी त्याचबरोबर काळे झेंडे दाखवणे हा चांदा ते बांदा कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकारला आता यावर तातडीने निर्णय घ्यावा लागणार आहे. राज्यभरामध्ये सकल मराठा समाज त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चा, विविध सामाजिक संघटनांकडून आता मराठा आरक्षणासाठी वज्रमुठ आवळण्यात आली आहे. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न आता दिवसागणिक राज्यांमध्ये गंभीर होत चालला आहे. 


आज सातारा सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मराठा समाजाच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर सांगलीमध्ये सुद्धा आज सर्वपक्षीय आमदार, खासदार एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. दरम्यान, कराडमध्ये होत असलेल्या मोर्चाला कराड आणि संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा समाजातील बांधव येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. या मोर्चासाठी गावोगावी जनजागृती सुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे लाखोंच्या संख्येने मराठा समाज मोर्चाला उपस्थित राहतील असा दावा करण्यात येत आहे. मोर्चाने मराठा समाजाकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. 


दुसरीकडे, कोल्हापूरमध्ये सुद्धा मराठा आरक्षणासाठी आता ठिणगी पडली आहे. कोल्हापुरात दसरा चौकामध्ये साखळी उपोषणाला रविवारपासून सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर मराठा समाजातील कार्यकर्तेही मनोज  जरांगे यांची भेट घेणार आहेत. मराठवाड्यामध्ये सुद्धा मोठा वणवा पेटला असून राजीनामास्त्र सुरू आहे. त्याचबरोबर राजकीय पक्षांना सुद्धा आता याचे फटके बसू लागले आहेत. बीडमध्ये ठाकरे गटाच्या 36 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती बिकट होत चालली आहे. मराठा आरक्षणासाठी आता गावोगावी सुद्धा एल्गार सुरू झाला आहे. अनेक गावांमध्ये पुढाऱ्यांना बंदी सुरू असतानाच राजीनामे सुद्धा पडू लागले आहेत. माढा तालुक्यातील राजनी भिमानगर ग्रामपंचायत सरपंच चंचला विजय पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरपंचपदाचा राजीनामा दिला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.