Radhakrishna Vikhe Patil Met Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. पाच दिवसांच्या उपोषणानंतर त्यांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान, आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)  यांनी मनोज जरांगे पाटील यांची रुग्णालयात भेट घेतली. कामानिमित्त आलो होतो म्हणून जरांगे पाटील यांच्या तब्बेतीची चिंता होती, त्यामुळं त्यांची भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी काळजी घ्यावी ही विनंती केली. कारण समाजाची काळजी सरकार घेत असल्याचे विखे पाटील म्हणाले. 

Continues below advertisement

 प्रामाणिक भावनेने जे जे आवश्यक आहे ते सर्व केले

मराठा आरक्षणाच्या संदर्भात काढलेल्या जीआरबाबत संभ्रम आहे. याबाबत विचारले असता विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी दिल्यानंतर प्रामाणिक भावनेने जे जे आवश्यक आहे ते सर्व केले आहे. तरी पण काही लोक घरी बसून त्यावर टीका टिप्पणी करत असल्याची टीका विखे पाटलांनी केली. पब्लिकमध्ये जाऊन बोलायची गरज नाही त्यांनी मला येऊन सांगायला पाहिजे. कुठलीही त्रुटी नाही. मात्र, काही बदल करायची असेल तर ते होईल असेही विखे पाटील म्हणाले. 

काही लोक नाराज, पण त्यांनी कधी आंदोलनात सहभाग घेतला नाही

लोकांना आधी समजू द्या नेमके काय काम चालू आहे. त्यावरुन लोकांना पण नंतर कळेल कसे काम सुरु आहे, त्यावेळी संभ्रम दूर होईल असे विखे पाटील म्हणाले. काही लोक नाराज आहेत त्यांनी कधी आंदोलनात सहभाग घेतला नाही कधी येऊन भेटले नाही आणि आता संभ्रम निर्माण करत असल्याचे विखे पाटील म्हणाले. जशा अडचणी येतील तशा दुरुस्ती करु असेही विखे पाटील म्हणाले. मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यांना मी सकाळी बोललो आहे असे विखे पाटील म्हणाले. ज्यांना वाटतं आम्ही फसवणूक केली त्यांना मी काही करु शकत नाही. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की सरकारी चर्चेत तुम्हाला यायला काय अडचण होती. तुम्ही तुमची मतं मांडली असती तर ऐकले असते असेही विखे पाटील म्हणाले.  

Continues below advertisement

चर्चेसाठी या, संभ्रम निर्माण करणाऱ्यांना माझी विनंती

संभ्रम निर्माण करणाऱ्यांना माझी विनंती आहे माझ्याकडे या आपण चर्चा करु मी माझे दरवाजे बंद केले नाहीत असे विखे पाटील म्हणाले. यावेळी विखे पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली. त्यांना काही काम देण्याची गरज आहे. पक्ष सत्तेत नसल्यामुळे त्यांच्याकडे काही काम नाही. मला वाटते संजय राऊत यांनी कोचिंग क्लास घेतले पाहिजे असी टीका विखे पाटील यांनी केली. 

विखे पाटलांनी घेतलेल्या भेटीबाबत मनोज जरांगे काय म्हणाले?

हैदराबाद गॅझेट सातारा गॅजेटमध्ये कशी प्रक्रिया राबवायची याबद्दल चर्चा करायची आहे. प्रक्रियेमध्ये जास्त वेळ जाऊ नये म्हणून काही बदल करायचे आहेत असे विखे पाटील म्हणाले. दोन दिवसाच्या आत विषय संपला पाहिजे. दोन दिवसात प्रमाणपत्र मिळाले पाहिजे यासाठी दुरुस्ती असेल तर काही मुद्दे असेल त्यासाठी त्यांनी अभ्यासकांना बोलावले आहे असे विखे पाटील म्हणाले. एकदा जीआर वर काम चालू झाले की प्रमाणपत्र वाट पाहायला वेळ लागला नाही पाहिजे त्यासाठी चर्चा होणार आहे असे विखे पाटील म्हणाले.  हैदराबाद गॅझेटमध्ये लिहिले आहे की मराठवाड्यात मराठा नव्हताच; त्यानुसार मराठवाड्यातील सर्व मराठी आरक्षणात जाईल असे विखे पाटील म्हणाले. होईल सगळं होईल तुम्ही थांबा, मराठवाडा सगळा आरक्षणात जाणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. माझ्यावर विश्वास ठेवा गैरसमज करणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका. राजकारण हाकणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवून पायावर दगड पाडून घेऊ नका असेही विखे पाटील म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Manoj Jarange Patil Mumbai Morcha: राज्य सरकारकडून मराठा समाजाच्या उपसमितीचं पुनर्गठन; विखे पाटील अध्यक्षपदी, महाजन, भूसे, सामंत, कोकाटेंचाही समावेश