Maratha Reservation Live Updates : राज्याने तत्परतेने निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा : प्रवीण दरेकर

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या निकालानंतर आता 102व्या घटानादुरुस्ती विधेयकात बदल करण्यात येणार आहे. आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत नव्या बदलांना मंजुरी मिळणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Aug 2021 05:25 PM

पार्श्वभूमी

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या निकालानंतर 102व्या घटनादुरुस्ती विधेयकात बदल करण्यात येणार आहे. आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत नव्या बदलांना मंजुरी दिली जाणार आहे. केंद्र सरकार बदल करणार असल्याची या विधेयकात...More

भाजप पहिल्यापासूनच मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक- प्रविण दरेकर

प्रविण दरेकर : केंद्र सरकारने यापूर्वीच भूमिका मांडली होती, भाजप पहिल्यापासूनच मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे, आज केंद्रीय मंत्रिमंडळात निर्णय झाला आहे, त्यामुळं विरोधकांना ही एक थप्पड आहे. आता आरक्षण मुद्द राज्याच्या अखत्यारीत येत आहे, राज्याने तत्परतेने निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे