Maratha Reservation LIVE UPDATE : मराठा संघटनांचा उद्याचा बंद मागे

मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांकडून 10 ऑक्टोबर, शनिवारी बंदचं आवाहन केलं आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Oct 2020 08:08 AM
मराठा संघटनांचा उद्याचा बंद मागे; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर बंद मागे घेण्याचा निर्णय, सरकारने अनेक मागण्या मान्य केल्याने 10 ऑक्टोबरचा बंद मागे घेतला, मराठा सकल महासंघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांची माहिती
अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचा निर्णय, MPSC परीक्षा होणार त्याला विरोध नाही, एमपीएससी परीक्षेला मराठा संघटनेचा विरोध नाही, सरकारने घेतलेला अजून निर्णय होता त्या निर्णयाला कोर्टाने स्थगिती दिली आहे यामुळे इतर समाजाच्या मुलांचे नुकसान होऊ नये यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती नानासाहेब जावले यांनी दिली आहे

मराठा आरक्षण संदर्भात आज महत्वपूर्ण बैठकी:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अशोक चव्हाण हे खासदार संभाजी राजे यांच्याशी बैठक करणार,

आमदार विनायक मेटे यांच्यासमवेतही आज राज्य सरकारची बैठक,

गोलमेज परिषदेचे सुरेश पाटील यांच्याशीही मुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण चर्चा करणार,

राज्यभरातील मराठा समाजाच्या विविध प्रतिनिधींशी देखील राज्य सरकारची आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा
मराठा आरक्षण संघर्ष समितीनं मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून पुन्हा वातावरण पेटणार असं चित्र निर्माण झालंय. नऊ ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 10 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्र बंद ठेवणार अशी घोषणा सुरेश पाटील यांनी मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं केली आहे.

पार्श्वभूमी

मुंबई : मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या नेतृत्वाबद्दल खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे यांना समाजाकडून आवाहन केलं जात आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनावरुन या दोन्ही राजेंवर जहरी टीका केली. पुण्यात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, दोन्ही राजांचा आंदोलनाला पाठिंबा आहे, असं मला वाटत नाही. यातील एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजी छत्रपती यांनी भूमिका घेतली आहे पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देत आहेत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यांनी यावेळी मराठा आरक्षणासाठी 10 तारखेला पुकारलेल्या बंदला पाठिंबा दिला आहे.


 


आंबेडकर म्हणाले की, दोन्ही राजांचा 10 तारखेच्या आंदोलनाला पाठिंबा आहे असं मला वाटत नाही. यातील एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजी छत्रपती हे आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देतायत. ज्या व्यक्तिला घटना माहीत नाही, जो व्यक्ती असं म्हणतो की आम्हाला आरक्षण मिळालं नाही, तर कोणालाच मिळू नये याला भाजपने राज्यसभेवर कसं पाठवलं याचं आश्चर्य आहे. मी कोणालाही अंगावर घ्यायला घाबरत नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते म्हणाले की, मराठा समाजाने महाराष्ट्राला आतापर्यंत खुप चांगले नेतृत्व दिले आहे.  ते नेतृत्त्व सगळ्यांचा विचार करणारे होते.  आता जे नेतृत्व करत असल्याचं दाखवतायत ते खुजे आहेत. स्वतःच आस्तित्व टिकवण्यासाठी जातीचा आधार घेत आहेत, असं आंबेडकर म्हणाले.


 


10 तारखेला पुकारला बंद


 


मराठा आरक्षण संघर्ष समितीनं मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.  महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून पुन्हा वातावरण पेटणार असं चित्र निर्माण झालंय. नऊ ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 10 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्र बंद ठेवणार अशी घोषणा सुरेश पाटील यांनी मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं केली आहे. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अनेक मराठा संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. सुरेश पाटील यांनी EWS आरक्षण तात्काळ लागू करा, नोकरभरती बंद करा अशा मागण्या समोर ठेवत बंदचा इशारा दिला आहे. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कडकडीत बंद पाळला जाईल असा इशारा दिलाय.


 


एमपीएसी परीक्षा पुढे ढकला अन्यथा...- खासदार संभाजीराजे


 


रविवारी राज्यभरात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकला अन्यथा त्यादिवशी राज्यभरात जी परिस्थिती निर्माण होईल याला राज्य शासन जबाबदार असेल असा इशारा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे.याबाबत अधिक माहिती देताना संभाजीराजे म्हणाले की, राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही संख्या नियंत्रणात अजूनही येतं नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा घेणं म्हणजे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत भर घालण्याचा प्रकार आहे. ही परीक्षा 200 जागांसाठी होणार आहे. आणि या परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 2 लाखांच्या घरात आहे. जर यामध्ये कुठल्या विद्यार्थ्यांला कोरोनाची लागण झाली तर त्याची सरकार जबाबदारी घेणार आहे का? जर ही परीक्षा झाली तर मराठा समाजातील कार्यकर्ते प्रत्येक केंद्रावर जाऊन परीक्षा केंद्र फोडून टाकतील. आज 2 लाख विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न असताना देखील सरकार परीक्षा घेतं असेल तर यामागे राजकीय षडयंत्र तर नाही ना याची देखील शक्यता नाकारता येतं नाही. हे षडयंत्र आम्ही होऊ देखील देणार नाही. नवी मुंबईतील माथाडी भवन येथे राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समनव्यक आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला खासदार छत्रपती संभाजीराजे उपस्थित होते. यावेळी बोलताना संभाजीराजेंनी ही भूमिका मांडली. यावेळी राज्यभरातील काही एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा नाही झाली तर आमची वयोमर्यादा संपेल अशी भीती देखील व्यक्त केली. याला उत्तर देताना संभाजीराजे यांनी अशा विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांची वयोमर्यादा वाढवून द्या अशी देखील सरकारकडे मागणी केली.


 


बैठकीकडे पुन्हा उदयनराजेची पाठ


 


राज्यभरात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षण प्रश्नी मराठा समाजात विविध गट निर्माण झाले आहेत. यामध्ये इडब्ल्यूएस आरक्षणाच्या बाजूने एक गट आहे तर दुसरा गट एसइबीसीचं आरक्षणचं मिळायल हवं यासाठी आग्रही असल्याचं पाहिला मिळत आहे. हे गट मोडून सर्व नेत्यांची एकच मागणी व्हावी यासाठी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे प्रमुख नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबईतील माथाडी भवन येथे राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीचं नेतृत्व खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे भोसले यांनी करावं अशी आग्रही मागणी होती. परंतु या बैठकीकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा पाठ फिरवल्याचं पहिला मिळालं. याआधी नाशिक आणि पुणे येथे विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण विचार मंथन बैठीकच आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी देखील खासदार उदयनराजे यांना निमंत्रण देण्यात आलं होतं परंतु उदयनराजे यांनी त्यादेखील बैठकांकडे पाठ फिरवली होती.


 


उदयनराजे साताऱ्यात घेणार मेळावा
मराठा नेत्यांमधील मतभेद मिटवण्यासाठी नवी मुंबईत मेगा बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीसाठी खासदार संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे भोसले दोघेही उपस्थित राहणार असल्याचं बोलंल जात होतं. परंतु, आता या बैठकीला उदयनराजेंनी पाठ फिरवली  येत्या 15 दिवसांतच उदयनराजे स्वतः बैठक घेणार असल्याची माहिती मिळत आहे. साताऱ्यात ते राज्यव्यापी मेळावा भरवणार असून या मेळाव्यासाठी संभाजीराजे आणि शिवेंद्रराजेंनाही निमंत्रण दिलं जाणार असल्याचं बोलंलं जात आहे.


 


VIDEO | नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर


 



 


संबंधित बातम्या


 


एमपीएससी परीक्षा पुढे ढकला अन्यथा होणाऱ्या नुकसानाला सरकार जबाबदार : खासदार संभाजीराजे


 


नवी मुंबईतील मराठा समाजाच्या बैठकीला उदयनराजेंची पाठ, साताऱ्यात राज्यव्यापी मेळावा घेणार


 


MPSC Exam | एमपीएससी परीक्षेवरुन मराठा विद्यार्थी, संघटनांमध्ये मतमतांतर

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.