Manoj Jarange Patil : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल दोन तास बंददाराआड चर्चा झाली आहे. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याबाबतची माहिती खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी राधाकृष्ण विखे पाटलांना स्पष्ट पणाने सांगितल आहे, की, मला जीआर नुसार प्रमाणपत्र पाहिजे. एक-दोन तास मी त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे.
विखे पाटील साहेबांमध्ये शंभर टक्के प्रामाणिकपणा
विखे पाटील साहेबांमध्ये आम्हाला शंभर टक्के प्रामाणिकपणा दिसत आहे. तो माणूस 100 टक्के गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचे कल्याण करेल असा आम्हाला विश्वास वाटत असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. ज्या दिवशी वाटणार नाही त्या दिवशी आपण सरकारच्या विरोधात जाणार असल्याचे जरांगे म्हणाले. तुम्ही आरक्षण दिलं तर आम्हाला काय घेणं पडलं राजकारणाचं , जो देईल तो आमचाच असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
2 सप्टेंबरला मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयावर दोघांमध्ये चर्चा
मराठा उप समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil ) यांनी आज मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांची भेट घेतली. यासाठी ते अंतरवाली सराटीत दाखल झाले आहे. 2 सप्टेंबरला मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयावर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. एकीकडे राज्यभरामध्ये ओबीसी समाज मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरला विरोध करत असताना दुसरीकडे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील हे मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण केलं होतं. यानंतर सरकारनं त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या. त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले होते. उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यावेळी देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी रुग्णालयात जरांगे पाटीलयांची भेट घेऊन तब्बेतीची विचारपूस केली होती
महत्वाच्या बातम्या: