अंतरवाली सराटी (जालना); मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात गेल्या 13 दिवसांपासून मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे उपोषण सुरू आहे. त्यांच्या याच उपोषणा दरम्यान पोलिसांनी लाठीमार केला होता. या घटनेनंतर राज्यभरातील मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील या घटनेच्या निषेर्धात आणि मनोज जरांगे यांच्या समर्थनात राज्यभरात वेगवेगळे आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी याच आंदोलनाला हिंसेचे वळण लागतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे यापुढे राज्यात कुठेही रास्ता रोको किंवा चक्काजाम आंदोलन करू नयेत असे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केला आहे. 


अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या उपोषणावर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर याचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहे. कुठे टायर जाळले जात आहे, कुठे बस फोडल्या जात आहे, तर काही ठिकाणी शासकीय मालमत्तेचे नुकसान करण्यात येत आहे. तसेच ठीकठिकाणी रास्ता रोको करत आंदोलनही होत आहे. मात्र, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्याला शांततेत आपली भूमिका मांडायची असल्याचे मत मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे यापुढे कोणतेही उग्र आंदोलन करू नये असे आवाहन जरांगे यांनी केला आहे.


काय म्हणाले मनोज जरांगे?


दरम्यान याबाबत माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, यापुढे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उग्र आंदोलन करू नका. शांततेत आंदोलन सुरू असल्याने काहींना पोटजळी होत आहे. मी मराठा समाजाला आवाहन करतो की, आपलं आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे शांततेत सुरू असलेलं आंदोलन काहींना पाहिले जात नाही. काहींना पोटजळी होतेय. आंदोलनात दुसरेच लोकं मध्येच घुसत आहे. त्यामुळे उग्र आंदोलन करू नका, गावात शाततेत साखळी उपोषण करा. तसेच यापुढे रस्ता रोको, चक्का जाम आंदोलन करू नका. तुमच्या जाळपोळ, दगडफेकीला माझं समर्थन नाही. तसेच,  ओबीसी बांधवांना काही म्हणू नका. गावागावातील ओबीसी लोकांना वाटत आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळाव. त्यामुळे शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन जरांगे यांनी केले आहे.


टोकचे पाऊल उचलू नका! 


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलन होत आहे. काही ठिकाणी तरुण टोकाचे पाऊल उचलत आहे. त्यामुळे काही ठिकाणी आत्महत्या सारख्या घटना देखील समोर येत आहे. तर काही ठिकाणी स्वतःची वाहनं पेटवून दिल्याच्या घटना देखील समोर आल्या आहे. त्यातच काल औरंगाबाद येथे एका तरुणाने अंगावर डिझेल घेऊन स्वतःला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी असे कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका असे आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Kopardi Rape Case : सरकारने फाशी दिली नाही, पण देवाने न्याय केला; कोपर्डीतील आरोपी आत्महत्या प्रकरणावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया