मुंबई : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर नोकर भरती संदर्भात मोठा प्रश्न निर्माण झालाय. याआधी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गातील होणारी नोकरभरती थांबवण्यात आलेली होती. जवळपास सहा हजाराच्या आसपास एसईबीसी प्रवर्गातील पदांना स्थगिती दिली होती. त्यामुळे ही पद खुल्या प्रवर्गात वर्ग करायची की राज्य सरकारच्या लढाईपर्यंत रिक्त ठेवायची? असा पेच प्रशासनासमोर निर्माण झालाय.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लाखोंच्या संख्येने मोर्चे झाले, आंदोलनं झाली. अखेर 30 नोव्हेंबर 2018 रोजी युती सरकारने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरवत आरक्षण दिलं. त्यात न्यायालयीन लढाई सुरू झाली आणि मुंबई उच्च न्यायालयाने ही 27 जून 2019 ला या आरक्षणाला एकप्रकारे हिरवा कंदील दिला. राज्य सरकारच्या अनेक विभागात नोकर भरतीला सुरवात झाली. त्यातून नवीन एसईबीसी प्रवर्गाच्या जागा ठेवण्यात आल्या. मात्र काही दिवसातच सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आणि एसईबीसी प्रवर्गातील नोकर भरतीला खीळ बसली. एसईबीसी प्रवर्गातून अनेक उमेदवारांची भरती प्रक्रिया पार पडली मात्र स्थगिती आल्यामुळे नियुक्ती पत्र देणं सरकारने थांबवल तर अनेक विभागाच्या नोकर भरतीच्या जाहिराती निघून एसईबीसी प्रवर्गातील भरती थांबवली.
भरती प्रक्रिया पार पडली मात्र सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती आल्यानंतर तब्बल 2125 उमेदवारांना नियुक्तीपत्र देणे थांबवण्यात आल. तर नोकर भरतीची जाहिरात दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालायची स्थगिती आली त्यानंतर 3827 उमेदवारांची भरतीप्रक्रिया थांबवण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयापर्यंत एसईबीसी आरक्षणाच्या प्रवर्गातील तब्बल 5952 पदं अद्याप रिक्त ठेवण्यात आली होती.
रिक्त ठेवण्यात आलेल्या पदांची विभागवार आकडेवारी
सामान्य प्रशासन विभाग(भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीपत्र न दिलेले)
द्वितीय श्रेणीतील- 12 उमेदवारतृतीय श्रेणीतील- 27 उमेदारजाहिरात दिलेली पदे द्वितीय श्रेणीतील - 12एकूण - 52
महसूल विभाग(भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीपत्र न दिलेले)
प्रथम श्रेणीतील - 15 उमेदवारद्वितीय श्रेणीतील- 17 उमदेवारतृतीय श्रेणीतील - 85 उमेदवारजाहिरात दिलेली पदे द्वितीय श्रेणीतील- 9एकूण - 126
गृह विभाग(भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीपत्र न दिलेले)
प्रथम श्रेणीतील - 6द्वितीय श्रेणीतील - 4जाहिरात दिलेली पदे द्वितीय श्रेणीतील- 169एकूण 179
अर्थ विभाग(भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीपत्र न दिलेले)
प्रथम श्रेणीतील 4तृतीय श्रेणीतील 23(जाहिरात दिलेली पदे) प्रथम श्रेणी - 4द्वितीय श्रेणीतील 17एकूण 31
नगरविकास विभाग (मेट्रो)(भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीपत्र न दिलेले)द्वितीय श्रेणीतील - 28तृतीय श्रेणीतील - 75चतुर्थ श्रेणीतील- 2जाहिरात दिलेली पदे द्वितीय श्रेणीतील - 17एकूण 122
कृषी विभाग(भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीपत्र न दिलेले)तृतीय श्रेणीतील 113(जाहिरात दिलेली पदे)प्रथम श्रेणीतील- 330द्वितीय श्रेणीतील - 17तृतीय श्रेणीतील- 108चतुर्थ श्रेणीतील- 88एकूण 656
उच्च व तंत्र शिक्षण विभाग(भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीपत्र न दिलेले)
प्रथम श्रेणीतील - 133तृतीय श्रेणीतील - 4(जाहिरात दिलेली पदे)प्रथम श्रेणीतील - 3तृतीय श्रेणीतील - 1एकूण 141
ग्राम विकास विभाग(भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीपत्र न दिलेले)
प्रथम श्रेणीतील - 6द्वितीय श्रेणीतील - 4(जाहिरात दिलेली पदे)प्रथम श्रेणीतील - 1द्वितीय श्रेणीतील - 2तृतीय श्रेणीतील - 2055एकूण 2065
उद्योग विभाग(भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीपत्र न दिलेले)द्वितीय श्रेणीतील - 3
आदिवासी विभाग(भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीपत्र न दिलेले)प्रथम श्रेणीतील - 1(जाहिरात दिलेली पदे)प्रथम श्रेणीतील 1द्वितीय श्रेणीतील 1एकूण 3
ऊर्जा विभाग(भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीपत्र न दिलेले)
प्रथम श्रेणीतील - 11द्वितीय श्रेणीतील - 4तृतीय श्रेणीतील - 148(जाहिरात दिलेली पदे)प्रथम श्रेणीतील - 8द्वितीय श्रेणीतील - 9तृतीय श्रेणीतील - 3एकूण 183
मराठी भाषा विभाग(भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीपत्र न दिलेले)प्रथम श्रेणीतील - 2(जाहिरात दिलेली पदे)प्रथम श्रेणीतील - 2एकूण 4
शालेय शिक्षण विभाग(भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीपत्र न दिलेले)तृतीय श्रेणीतील - 1343(जाहिरात दिलेली पदे)द्वितीय श्रेणीतील - 3एकूण - 1346
सार्वजनिक आरोग्य विभाग(भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीपत्र न दिलेले-)प्रथम श्रेणीतील- 58(जाहिरात दिलेली पदे)प्रथम श्रेणीतील- 35तृतीय श्रेणीतील - 745एकूण 838
सहकार विभाग(जाहिरात दिलेली पदे)द्वितीय श्रेणीतील - 2एकूण 2
कौशल्य विकास विभाग(जाहिरात दिलेली पदे)द्वितीय श्रेणीतील - 6एकूण 6
पाणीपुरवठा विभाग(जाहिरात दिलेली पदे)प्रथम विभाग - 6द्वितीय श्रेणीतील - 84तृतीय श्रेणीतील विभाग - 65एकूण 155
वैद्यकीय शिक्षण विभाग(जाहिरात दिलेली पदे)
द्वितीय श्रेणीतील - 1तृतीय श्रेणीतील - 9चतुर्थ श्रेणीतील - 1एकूण - 11
सार्वजनिक बांधकाम विभाग(जाहिरात दिलेली पदे)
प्रथम श्रेणीतील -13