रत्नागिरी : रत्नागिरीतील चिपळूणमध्ये 16 ऑक्टोबरला मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. कोपर्डीतील बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ मराठा समाजाचे मोर्चे काढले जात आहेत.


रत्नागिरी जिल्ह्याचा मराठा मोर्चा 16 ऑक्टोबरला काढण्याचा आज निर्णय घेण्यात आला. कोकणातील हा पहिलाच मराठा मोर्चा असेल. कोपर्डीतील अत्याचाराचा निषेध आणि अट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रभर मराठा समाजाकडून मूक मोर्चे काढले जात आहेत.

महाराष्ट्रातील राजकीय नेतेही या मोर्चाला हजेरी लावताना दिसत आहेत. या मोर्चांमधून मराठा आरक्षणाची मागणीही करण्यात येत आहे.