मराठा मोर्चाचं वादळ आज उत्तरेकडे, बुलडाण्यात नि:शब्द क्रांतीचा हुंकार
एबीपी माझा वेब टीम | 26 Sep 2016 03:16 PM (IST)
बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रानंतर आता मराठा मोर्चांचं वादळ उत्तरेकडे वळलं आहे. बुलडाण्यातल्या मराठा मूकमोर्चासाठी विराट जनसागर उसळला होता. जयस्तंभ चौकातल्या मंचावरुन जिकडे नजर जाईल तिकडे मोर्चेकरांची गर्दी दिसत होती. गर्दी जास्त झाल्यानं आयोजकांनी जयस्तंभ चौकापर्यंत केवळ महिलांना प्रवेश दिला. तर पुरुष मंडळींना जयस्तंभ परिसराच्या बाहेरचं थांबवलं गेलं.