सांगली: आरक्षण हे आता न्यायालयाच्या अखत्यारित आहे. तरीही मंत्र्याच्या गाड्या फोडून आरक्षण मिळणार असेल तर गाड्या फोडा. यामुळे समाजाचे मोठं नुकसान होणार आहे हेही लक्षात ठेवा. पण काही पेड लोक या आंदोलनांत घुसली आहेत, त्यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे. त्यांना हे आंदोलन बदनाम करायचे आहे, असा आरोप महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. ते एबीपी माझाशी बोलत होते.
काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कार, मोर्चेकऱ्यांनी चंद्रकांत खैरेंना हाकललं
महाराष्ट्र चार वर्षे उत्तम चालला. शेतकऱ्याची कर्जमाफी झाली. मात्र हिंसक आंदोलनासारखे प्रकार निवडणूक वर्षात वाढणार आहेत. त्यामुळे खरे आंदोलक जे आहेत त्यांनी या पेड लोकांना, समाजकंठकांना खड्यासारखे बाजूला करायला हवे, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं.
आम्ही सरकार म्हणून या आंदोलनकर्त्यासोबत चर्चेला तयार आहोत, असेही ते म्हणाले.
आरक्षण मागणीसाठी जीव गमवावा लागलेल्या काकासाहेब शिदेंची घटना दुःखद आहे. पण या मार्गाने काही प्रश्न सुटणार नाहीत. सरकारच्या हातात जेवढे आहे तेवढे आम्ही केले आहे. आता आरक्षणाची गोष्ट न्यायालयानलयीन बाब आहे. त्यामुळे जे आपल्या हातात नाही त्यासाठी आंदोलन करून काही उपयोग होणार नाही. आज पंढरपूरमध्ये 7 लाख वारकरी अडकून आहेत, याला कोण जबाबदार आहेत, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र बंद
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने आज 24 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रवींद्र पाटील यांनी ही घोषणा केली. मृत्यू झालेल्या काकासाहेब शिंदे यांना शहीद घोषित करुन त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी, हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत मेगाभरती रोखावी, स्थानिक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी केल्या आहेत.
संबंधित बातम्या
काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कार, मोर्चेकऱ्यांनी चंद्रकांत खैरेंना हाकललं
LIVE मराठा क्रांती मोर्चाकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक
मराठा आरक्षणासाठी गोदावरीत उडी मारणारा काकासाहेब शिंदे कोण होता?
मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष करु नये : संभाजीराजे
औरंगाबादमध्ये आंदोलकाचा मृत्यू
सरकारच्या हातात जे होतं ते केलं, आता निर्णय न्यायालयाचा: चंद्रकांत पाटील
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jul 2018 12:24 PM (IST)
काही पेड लोक या आंदोलनांत घुसली आहेत, त्यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे. त्यांना हे आंदोलन बदनाम करायचे आहे, असा आरोप महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. ते एबीपी माझाशी बोलत होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -