सोलापूर : गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यानंतर आता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील गौप्यस्फोट केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार संपर्कात असून त्यातील काही जण याच आठवड्यात राजीनामा देतील असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.


विधानसभा निवडणुकांसाठी सहा महिन्यापेक्षा अधिक काळ असताना राजीनामा दिल्यास पोटनिवडणूक घ्यावी लागते. आता निवडणुकीत साधारण तीन महिने राहिले असल्याने अनेक राजीनामे याच आठवड्यात येतील असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाचाच आत्मविश्वास खचला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामे दिले आहेत. हे सगळं असताना खालच्या लोकांनी काम कसे करायचे, असे म्हणत राहूल गांधींसह ज्येष्ठ नेत्यांवरही निशाणा ही साधला.

VIDEO | काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपमध्ये आला तर कोणाला आश्चर्य वाटायला नको : चंद्रकांत पाटील | ABP Majha



1984 साली भाजपच्याही फक्त दोन जागा निवडून आल्या होत्या मात्र आम्ही हातपाय गाळून न बसता पक्ष वाढवला, त्यामुळे 303 खासदार निवडणूक आले, असे मतं चंद्रकांत पाटील व्यक्त केलं आहे. संपूर्ण देश हा भाजपमय होत असून नाव न विचारणाच्या अटीवर विचारलात तर सोलापुरातील काही जण संपर्कात असल्याचेही वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. तसेट नाव आताच जाहीर करण्यात मजा नाही असे म्हणत संपर्कात असलेल्या नेत्यांची नावं मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवली.

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ते पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आहेत. तुळजाभवानी आणि विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ते सोलापूरात आले आहेत. सोलापूरतल्या शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला.

VIDEO | काँग्रेस कार्याध्यक्ष पळवण्याच्या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर विश्वजीत कदमांचं उत्तर | एबीपी माझा