Mantralaya Bomb Threat: मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी (Mantralaya Bomb Threat) देणाऱ्याला अहमदनगर पोलिसांनी (Ahmednagar Police) ताब्यात घेतलं आहे. शेवगाव तालुक्यातील हसनापूर येथील बाळकृष्ण ढाकणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. बाळकृष्ण ढाकणे याने गुरुवारी (31 ऑगस्ट)  दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास 112 वर फोन करून मला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे आहे, असं म्हणत मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली.


दारुच्या नशेत हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती


दरम्यान, या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली होती. हा कॉल बाळकृष्ण ढाकणे याने केल्याची माहिती समोर आल्यानंतर शेवगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र, ढाकणे याने पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून फोन केल्याने त्याला पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. बाळकृष्ण ढाकणे याने दारुच्या नशेत हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ढाकणे हा स्पर्धा परीक्षा देत असल्याचीही माहिती आहे. त्याने हे कृत्य का केले याबाबत पोलीस तपासात सत्य समोर येणार आहे. मात्र, त्याने केलेल्या कृत्यामुळं एकच खळबळ उडाली होती.


पोलीस प्रशासन सतर्क


गेल्या 15 दिवसापूर्वी देखील असाच निनावे फोन आला होता. 15 दिवसात दुसऱ्यांदा मंत्रालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. निनावी फोन करणाऱ्याने मुख्यमंत्र्यांशी बोलणं करुन देण्याची इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांशी बोलणं करुन दिलं नाही तर मंत्रालयात ठेवलेल्या बॅाम्बने मंत्रालय उडवून देईल, अशी धमकी निनावी कॉल करुन दिली होती. दरम्यान, या घटनेनंतर मंत्रालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. सर्व पोलीस प्रशासन सतर्क झालं होतं. निनावी कॉल आल्याच्या काही वेळातच पोलिसांनी मंत्रालयात शोधमोहीम सुरू केली होती. मंत्रालयामध्ये डॉग स्क्वॉड द्वारे पोलीसानी मंत्रालयातील कानाकोपरा तपासाला. तपासाअंती बॉम्ब ठेवल्याची माहिती अफवा असल्याचे निष्पन्न झाले.मंत्रालयात धमकीचा कॉल करणारा व्यक्ती हा मूळचा अहमदनगरचा आहे. या व्यक्तीला काही कारणास्तव मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधायचा आहे आणि त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. या व्यक्तीचा मुख्यमंत्र्यांशी संपर्क होऊ न शकल्याने त्याने त्रस्त होऊन ही धमकी दिली.


महत्त्वाच्या बातम्या:


Mumbai: मुख्यमंत्र्यांशी बोलणं करुन द्या, नाहीतर...; गेल्या 15 दिवसांत मंत्रालय उडवून देण्याची दुसऱ्यांदा धमकी