Manoj Jarange Shantata Rally: मुंबई : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) शांतता रॅलीला (Shantata Rally) आज हिंगोलीतून (Hingoli) सुरुवात होणार आहे. जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असून 13 तारखेनंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं आहे. दरम्यान, हिंगोलीत जरांगेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सकाळी साडेअकरा वाजता जरांगेंच्या शांततात रॅलीला सुरूवात होणार आहे.
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली काढणार आहे. शनिवारी 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत ही जनजागृती रॅली आणि शांतता रॅली काढणार आहे. ही रॅली राज्यभरात टप्प्याटप्यानं घेतली जाणार आहे.
विधानसभेत 288 उमेदवार उभे करायचे की 288 पाडायचे? 13 तारखेनंतर ठरवणार : मनोज जरांगे
मनोज जरांगेंची शांतता जनजागृती रॅलीची सुरुवात आज हिंगोलीपासून होणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर मराठा समाज या रॅलीत सहभागी होणार आहे. तसेच, विधानसभेत 288 उमेदवार उभे करायचे की 288 पाडायचे? 13 तारखेनंतर ठरवणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे.
शांतता जनजागृती रॅलीसाठी जरांगे अंतरवलीहून हिंगोलीकडे रवाना
आज सकाळी मनोज जरांगे पाटील हिंगोलीतील शांतता जनजागृती रॅलीसाठी सकाळी समर्थकांसह अंतरवलीहून हिंगोलीकडे रवाना झाले आहेत. साधारणतः सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मनोज जरांगे हिंगोली जिल्ह्यात दाखल होतील. बळसोंड येथे सकाळी साडेदहाच्या आसपास क्रेनच्या साहाय्यानं 30 फुटांच्या गुलाबाच्या फुलांच्या हरानं त्यांचं जंगी स्वागत केलं जाईल. त्यानंतर सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात ते छत्रपती शिवरायांना अभिवादन करतील. त्यानंतर सकाळी 11:30 वाजता शांतता रॅलीला सुरुवात होईल आणि दुपारी 3 वाजता या शांतता रॅलीचा समारोप होईल. रॅलीचा समारोप मनोज जरांगे यांच्या भाषणानं होईल. त्यानंतर मनोज जरांगे पत्रकार परिषदही घेणार आहेत.
कसा असेल मनोज जरांगेंच्या रॅलीचा मार्ग?
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा - पोस्ट ऑफिस रोड - आखरे मेडिकल - खुराना पेट्रोल पंप चौक महात्मा गांधी चौक - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा (बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करतील) - महात्मा गांधीजींचा पुतळा (महात्मा गांधीजींना अभिवादन करतील) - पुढे इंदिरा गांधी चौक इंदिरा गांधी चौकामध्ये जरांगे यांचं समारोपीय भाषण
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आजच्या हिंगोली दौऱ्याअगोदर भाजप नेते अशोक चव्हाण आणि शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे यांनी शुक्रवारी मनोज जरांगे यांची अंतरवली सराटी मध्ये जाऊन भेट घेतली आहे.
8 जुलैला शिंदे समिती हैदराबादच्या दौऱ्यावर
मनोज जरांगे यांची शांतता रॅली सुरू होणार आहे. त्या आधीच सरकारच्या हालचाली वाढल्या असल्याचं चित्र आहे. 8 जुलैला शिंदे समिती हैदराबादच्या दौऱ्यावर जाणार आहे. चार दिवसांचा हा दौरा असणार आहे. त्यात मनोज जरांगे यांची हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी असलेल्या मागणीबाबत पुरावे जमा ही शिंदे समिती करणार आहे. एकूण आठजण या दौऱ्यावर जाणार आहे आणि मराठा कुणबी - कुणबी मराठा या नोंदी ऐतिहासिक पुरावे हे सगळं हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून जमा करण्यासाठी शिंदे समितीची हा दौरा आहे.
पाहा व्हिडीओ : Manoj Jarange PC : मुंबईत जाण्याच ठरलं तर मोठी रॅली,मनोज जरांगे यांचा इशारा