Manoj Jarange Sabha : 'शब्द चार अन् मनोज जरांगे आरक्षणावर ठाम'; जरांगेंच्या सभेचे प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

Manoj Jarange Sabha : या सभेतून 24 डिसेंबरनंतर आंदोलनाची दिशा कशी असणार याबाबत मनोज जरांगे खुलासा करणार आहे. त्यामुळे या सभेतकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे.

एबीपी माझा वेबटीम Last Updated: 23 Dec 2023 12:43 PM

पार्श्वभूमी

Manoj Jarange Sabha : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) तिढा सोडवण्यासाठी सरकारने 24 डिसेंबरपर्यंत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडे मुदत मागितली होती. सरकारने घेतलेली मुदत उद्या संपत आहे. त्यापूर्वी आज बीड...More

इशारा सभास्थळी स्वयंसेवक ड्रेसकोडमध्ये

Manoj Jarange Sabha  : मनोज जरांगे पाटील यांच्या इशारा सभेला येणाऱ्या मराठा समाज बांधवांच्या व्यवस्थेसाठी वेगवेगळ्या तीन ड्रेसकोडमध्ये स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. सभेच्या ठिकाणी येणाऱ्या समाजबांधव यांना मदतीसाठी हे स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत.