Manoj Jarange Patil: कुणाच्या खोडीला कोणीही काही करु शकत नाही. जीआर आणि सगळे व्यवस्थित आहे. मराठवाड्यातील मराठा आरक्षणात जाणार असल्याने काहीही संभ्रम नसल्याचा पुनरुच्चार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार घेत असलेल्या जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत विरोध कऱणाऱ्यांना सुनावले. आम्हाला माजमस्ती, सरकार, फडणवीस यांचा राग असला असता तर आमची निब्बर मूल बनियानवर होते समजून घ्यावं. आमची मुलं मुंबईला जिवंत करून गेले, असे जरांगे म्हणाले.
त्रुटी असल्यास दुरुस्त करु
जीआरमधील त्रुटी मान्य आहे का अशी विचारणा केली असता त्यांनी त्रुटी असल्याचं त्यांनी मान्य केलं. तसेच त्यामध्ये दुरुस्त करू, असे त्यांनी सांगितले. संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेवर ते म्हणाले की, एवढी बार जाऊ द्या. हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हाताळलं. दुसरं कुणीही हाताळला नाही. सध्या राऊत तिकडून लईच बोलायला लागले आहेत. उपोषण आम्ही कारायच आणि श्रेय यांना का द्यायचं, असे ते म्हणाले.
गरीबाची लढाई गरीब मराठा लढत आहेत
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही जीआर दुरुस्त करून सुधारित जीआर काढायला सांगितले आहे. प्रक्रिया कशी, टाईम बाँड काय? कधीपासून द्यायला सुरुवात करणार आहे. याबाबत विखे पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री सरसकट नाही म्हणावं की अजून काही असेल, मात्र आम्ही आरक्षणात जाणार असल्याचे ते म्हणाले. गरीबाची लढाई गरीब मराठा लढत आहे. काही जण बरळत आहेत. आम्ही वेदना घेऊन पुढे जात आहोत. गेल्या 22 वर्षापासून मी स्वतःला झोकून काम करीत आहे आणि मी हे सिद्ध केलं असल्याचे ते म्हणाले. मला त्रास झाला. मात्र, माझा संघर्ष मी ढिला पडू दिला नसल्याचे ते म्हणाले.
यावरूनच मराठ्यांनी ओळखायचे की मराठे जिंकले
लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनावर ते म्हणाले की, यावरूनच मराठ्यांनी ओळखायचे की मराठे जिंकले आहेत. छगन भुजबळ यांच्या घुसखोरी वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, याला घुसखोरी म्हणता येणार नाही, याला अधिकृत म्हणतात. मराठा समाज अधिकृतपणे आरक्षणात जाण्यास सुरुवात झाली आहे. भुजबळ यांना पक्के माहिती होते हे आरक्षण घेणार म्हणून. भुजबळ ओबीसी नेते असल्याची ओळख मिटू देणार नाही. तो टेकला तरी त्याच्या अंगातील खोड जाणार नाही, असा खोचक टोला त्यांनी लगावला. भुजबळला जीआर चांगला कळतो. कारण त्याने कॅबिनेट हाताळली, तीन चार पक्ष हाताळल्याचा टोलाही त्यांनी लगावला. आम्ही ओबीसीत गेलो नसून ते आमच्यात आले, आम्ही पूर्वीचे आहोत, असेही जरांगे यांनी म्हटलं आहे.
मंडल आयोगावर चॅलेंज करेन
त्यांनी सांगितले की, भुजबळ कोर्टात गेले तरी काहीही होणार नाही. हैदराबाद गॅझेट सरकारी दस्तऐवज आहे. जर कोर्टात काही झाल्यास मंडल आयोगावर चॅलेंज करेन, असे आव्हान त्यांनी दिले. आहे या जीआरवर मराठवाड्यातील सर्व मराठा आरक्षणात जातात. असे त्यांनी सांगितले.