Sanjay Raut on Amit Shah: काय उखडायचं ते उखडा, मुंबई मनपामध्ये सत्ता ठाकरे बंधूंची येणार आहे, आमचा भगवा बीएमसीवर फडकणार आणि आमचाचं महापौर बीएमसीमध्ये बसणार हे मी शिंदेना सुद्धा सांगतो आणि त्या भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांना पण सांगतो, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर हल्लाबोल केला. अमित शाह यांनी मुंबईत भाजपचाच महापौर होणार असल्याचे वक्तव्य केल्यानंतर संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला.अमित शाह जेव्हा मुंबईत आले होते तेव्हा एकनाथ शिंदे शेपटीसारखा त्यांच्या मागे फिरत होते. मुंबईत आल्यावर अमित शाह यांनी सगळ्यांना सांगितलं मुंबई महापलिकेचा महापौर भाजपचा होणार, तेव्हा शिंदे का नाही म्हणाले नाहीत, महापौर शिवसेनचा बसणार मराठी बसणार? अशी विचारणाही संजय राऊत यांनी केली. 

दोन भावाना एकत्र येऊ द्यायचं नव्हतं

संजय राऊत म्हणाले की, या सगळ्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत मैत्री केली होती ती फक्त दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून, पण आता दोन भाऊ एकत्र येत आहेत तर त्यांची मैत्री पातळ झाली आहे. त्यांना दोन भावाना एकत्र येऊ द्यायचं नव्हतं. आता दोन भाऊ एकत्र आले असल्याचे ते म्हणाले. 

मिस्टर अजित पवार कुठे गेली तुमची शिस्त?

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. अजित पवार यांच्या शिस्तीचा दाखला देत त्यांनी मिस्टर अजित पवार कुठे गेली तुमची शिस्त? अशी विचारणा त्यांनी केली. ते म्हणाले की, तुम्ही म्हणतात ना बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. मग तुमच्या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्यासाठी तुम्ही  यंग आयपीएस अधिकाऱ्याला कारवाई करण्यापासून रोखायला सांगता. या दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रा लुटला आहे आणि आता त्यांचे हस्तक उरला सुरला महाराष्ट्र लुटत आहेत. मुरूम उपसण्याचे  बेकायदेशीर काम सुरू होतं आणि त्यावर कारवाई करत असताना तुम्ही आयपीएस अधिकाऱ्याला सांगता कारवाई करू नका? अजित पवारांचा पक्ष आणि शिंदे यांचा पक्ष या सगळ्यांकडे डाकू,लुटेरे असे सगळे आहेत. शेळके यांच्या वेळी सुद्धा मी असंच प्रकरण बाहेर काढलं होतं, असे राऊत म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या