Manoj Jarange Patil : कोणाचाही बाप आडवा येऊ दे, आता मराठ्यांना ओबीसीतून टिकणारं आरक्षण आणणार असल्याचा एल्गार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)  यांनी केला आहे. ते नांदेडमध्ये बोलत होते. आंदोलन कधी ठरवून यशस्वी होतं नाही, आम्ही आमच्या ताकदीने आंदोलन करतो. मी कधी आंदोलन ठरवून केल नाही. भेटण्यासाठी मंत्री येतील किंवा जातील, पण 29 ऑगस्ला मुंबईला मोर्चा काढणार आणि येताना मराठा समाजाला ओबीसीतून टिकणार आरक्षण घेऊन येणारचं असा एल्गार  मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

Continues below advertisement

 शेवटची लढाई आहे कोणीही घरी राहू नये, जरांगे पाटलांचं आवाहन

मुंबई मोर्चाच्या अनुषंगाने मराठा बांधवाशी संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे पाटील नांदेड दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोणाचं पण बाप आडवा येऊ दे, कसलीही  जहागीरदाराची औलाद असू दे, मराठ्यापुढे  निभाव टिकू देणार नाही अस देखील जरांगे म्हणाले. या वेळेस पाच पटीने मराठा बांधव मोर्चात सहभागी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दौरे आणि सारखे बैठकामुळे मला अस्वस्था वाटले होते. कितीही तब्बेत खालवली तरी माझ्या मराठा बांधवाना आरक्षण मिळून देणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. शेवटची लढाई आहे कोणीही घरी राहू नये असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केलं. या मोर्चात मागच्यापेक्षा पाच पटीने जास्त मराठा बांधव सहभागी होणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे मुंबईत धडकणार आहे. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून, मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, असा ठाम निर्धार मनोज जरांगेंनी केलाय. 

Continues below advertisement

 मनोज जरांगे पाटील यांना विश्रांतीचा सल्ला

शुक्रवारी सकाळपासूनच नांदेडमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील कार्यकर्त्यांसोबत सलग बैठकांचं आयोजन केलं होतं. मागील काही दिवसांपासून त्यांच्या दौऱ्यांची व्याप्ती, सततचा प्रवास, भाषणं आणि बैठकींचा ओघ थांबलेला नाही. याच थकव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची प्रकृती खालावल्याचे बोलले जात आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याचे कळताच, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम तातडीने शासकीय विश्रामगृहात दाखल झाली. डॉक्टरांकडून सध्या त्यांच्या प्रकृतीची प्राथमिक तपासणी करण्यात आली. यावेळी डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटील यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.  

महत्वाच्या बातम्या:

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांकडून तपासणी; विश्रांतीचा दिला सल्ला, नेमकं काय घडलं?