Latur:लातूर जिल्ह्यातील तावरजा नदीच्या परिसरात गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत संततधार पाऊस झाला. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात भुसणी बॅरेजमध्ये साचले. मात्र बॅरेजचे दरवाजे न उघडल्याने पाणी शेतात शिरून पिके जलमय झाली. यातूनच झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.

Continues below advertisement


नेमकं काय झालं? 


काल रात्री 7 वाजल्यापासून आज पहाटेपर्यंत तावरजा नदीच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात भुसणी बॅरेजमध्ये साचले, मात्र बॅरेजचे दरवाजे न उघडल्याने पाणी शेतात घुसून पिके जलमय झाली. या घटनेत 50 वर्षीय शेतकरी खंडू रामकिसन देवकते यांच्या कुटुंबीयांची आठ एकर शेती त्याची दीड एकर शेती आहे..शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली. हातात आलेले पीक डोळ्यासमोर नष्ट झाल्याने ते मानसिक तणावात गेले आणि सकाळी गळफास घेऊन त्यांनी आपले जीवन संपवले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि दोन मुली असा परिवार आहे. सर्व मुलांचे विवाह झालेले आहेत. घटनेची माहिती मिळताच आमदार अमित देशमुख यांनी देवकते कुटुंबाची भेट घेऊन सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली असून पाऊस पडल्यानंतरही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. हातात आलेले पीक डोळ्यासमोर नष्ट झाल्याचे पाहून ते प्रचंड मानसिक तणावात गेले. अखेर शुक्रवारी सकाळी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांतून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


आमदार अमित देशमुखांचा दौरा, मदतीचे आश्वासन


घटनेची माहिती मिळताच आमदार अमित देशमुख यांनी गावात जाऊन देवकते कुटुंबीयांची भेट घेतली.   "मराठवाड्यात सर्वदूर पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कालपासून संततधार पाऊस सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने आपत्तीच्या सूचना वेळेवर पोहोचवल्या नाहीत. लातूर जिल्ह्यात अनेक नद्यांवर बॅरेजेस आहेत. त्यातील अनेक ठिकाणी दरवाजे नादुरुस्त आहेत. पाणी अडल्याने आजूबाजूच्या शेतीचे खूप नुकसान होतं. यातूनच नुकसान झाल्यामुळे हवालदिल झालेल्या खंडू देवकते यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करावी" असं देशमुख यांनी सांगितले. त्यांनी कुटुंबाला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.


प्रशासनाविरोधात संताप


स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र टीका केली आहे. पावसामुळे पिके वाचवण्यासाठी बॅरेजचे दरवाजे वेळेवर उघडणे आवश्यक असतानाही तसे झाले नाही. त्यामुळे पाणी शेतात घुसून हंगामाचे सर्व श्रम पाण्यात गेले. पावसाच्या हंगामात दरवाजे नादुरुस्त राहणे आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा विलंबित प्रतिसाद, हे घटक शेतकऱ्यांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.