Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. मराठा समितीने हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) मान्य असल्याचं सांगितलं आहे. त्यानुसार गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं समितीनं मान्य केलं आहे. या मागण्यांच्या संदर्भातील जीआर सरकार काढणार आहे. सरकारचा मसुदा अभ्यासकांना देखील मान्य आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या आहेत आणि कोणत्या मागण्या प्रलंबित आहेत याबाबतची माहिती पाहुयात.
मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या मान्य?
हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीसाठी शासन निर्णय - मान्यआंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत - मान्यआंदोलनातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी - मान्यमराठा आंदोलकांवरील केसेस मागे - मान्यप्रलंबित जात पडताळणीला मान्यता - मान्य आंदोलकांवरील गुन्हे घेण्यास मान्यता - मान्य
मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या प्रलंबित?
सातारा गॅझेट अंमलबजावणीसाठी - 1 महिन्याची मुदतमराठा-कुणबी एकच शासन निर्णय - 2 महिन्यांची मुदत
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे,
2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा...सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.
3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.
4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.
मराठा कुणबी आहे असा जीआर काढा
मराठा कुणबी आहे असा जीआर काढा, मराठा कुणबी एकच हा जीआर जारी करा अशी मागणी देखील जरांगे यांनी केली. यावर समितीने ते किचकट आहे त्याला वेळ लागेल म्हणे, 1 महिना लागेल. पण, मी म्हणतो त्याला 2 महिने घ्या पण जी आर काढा असे जरांगे पाटील म्हणाले. आता सगेसोयरेचा निर्णय घ्या म्हणालो. ते म्हणताय याला वेळ लागेल, 8 लाख चुकीच्या नोंदी आहेत, त्याबद्दल वेळ लागणार आहे. आता, हैदराबाद आणि सातारा या 2 गॅजेटच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. बाकी 5 मागण्यांचा शासन निर्णय काढू म्हणत आहेत, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी शासनाने आपल्या मागण्या मान्य केल्याची घोषणा केली. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आमरण उपोषण सोडलं आहे.
महत्वाच्या बातम्या: