Manoj Jarange Patil Bombay High Court Hearing मुंबई: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनासंदर्भात आज (2 सप्टेंबर) पुन्हा एकदा उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. या सुनावणीत मराठा आंदोलकांच्या बाजूने सतीश मानेशिंदे यांनी बाजू मांडली. तर राज्य सरकारकडून बिरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली. यावेळी मराठा आंदोलक हे सातत्याने नियमांचे उल्लंघन करत आहेत. आंदोलनकर्त्यांना केवळ आझाद मैदानात थांबण्याची परवानगी होती. मात्र, या नियमाचे उल्लंघन झाले, असे मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले. मराठा आंदोलकांना दक्षिण मुंबईचा परिसर आणि आझाद मैदान खाली करण्याची मुदत संपल्यानंतर आज (2 सप्टेंबर) दुपारी तीन वाजता उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
तत्पूर्वी न्यायालयाने दुपारी तीन वाजेपर्यंत आझाद मैदानाचा परिसर खाली झाला पाहिजे, असे निर्देश दिले होते. यानंतर पुन्हा झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने मराठा आंदोलकांवर ताशेरे ओढले. आझाद मैदानात आंदोलनासाठी केवळ 24 तासांची परवानगी दिली होती. मग तुम्ही तिथे अजून का थांबला आहात?, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाकडून विचारण्यात आला. यावर आम्ही शांततेत आझाद मैदानात बसलो आहोत, असं मनोज पाटील यांचे वकील म्हणाले. तसेच आतापर्यंत 54 मोर्चे शांततेत झाले आहेत, असं मनोज जरांगेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितले. यावर तुम्ही कोणत्या अधिकाराने तिथे बसले आहात तुम्हाला परवानगी नाही, असं उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले. त्यानंतर मनोज जरांगे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांच्याकडून उद्यापर्यंतचा वेळ मागण्यात आला. त्यानंतर उच्च न्यायालयाने मराठा आंदोलनाबाबतची सुनावणी उद्या म्हणजेच 3 सप्टेंबर दुपारी 1 पर्यंत तहकूब केली आहे. त्यामुळे एकप्रकार हा मनोज जरांगेंना दिलासाच असल्याचं बोललं जात आहे.
मुंबईत उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत काय काय घडलं?
मनोज जरांगेंचे वकील सतीश मानेशिंदे काय म्हणाले?
- सगळ्या गाड्या बाहेर पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
- जरांगे पाटील यांनी आदेश मराठा आंदोलकांना दिले आहेत.
- उपसमितीची बैठक सुरू असून विखे पाटील मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला येत आहेत.
राज्य सरकरकडून काय सांगण्यात आले?
- सगळ्या गाड्या अजून तिथेच आहेत.
- सतीश मानेशिंदे काय म्हणाले?
- उद्यापर्यंतचा वेळ द्या, परवा सुनावणी ठेवावी...
उच्च न्यायालय काय म्हणाले?
- तुम्ही तिथे का थांबला आहात?
- आझाद मैदानात केवळ 24 तासांची परवानगी दिली होती.
मनोज जरांगेंचे वकील सतीश मानेशिंदे काय म्हणाले?
- आम्ही शांततेत आझाद मैदानात बसलो आहोत.
- आतापर्यंत 54 मोर्चे शांततेत झाले आहेत.
उच्च न्यायालय काय म्हणाले?
- तुम्ही कोणत्या अधिकाराने तिथे बसले आहात तुम्हाला परवानगी नाही.
- तुम्हाला कोर्टाने आदेश दिले आहेत.
- आंदोलनकर्त्यांना केवळ आझाद मैदानात परवानगी होती.
- ते तिथे आणखीन थांबू शकत नाहीत.
- ते शहरात इतरत्र कुठेही थांबू शकतात.
- तुम्ही सतत नियमांच उल्लंघन करतायेत.
जरांगेंचे वकील सतीश मानेशिंदे काय म्हणाले?
- आम्हाला उद्यापर्यंत वेळ द्या...
उच्च न्यायालय काय म्हणाले?-
- तुम्ही सतत नियमांच उल्लघंन करत आहात.
- जरांगेंचे वकील सतीश मानेशिंदे काय म्हणाले?
- आम्हाला उद्यापर्यंत वेळ द्या...
उच्च न्यायालय काय म्हणाले?-
- तुम्ही सतत नियमांच उल्लघंन करत आहात.
जरांगेंचे वकील सतीश मानेशिंदे काय म्हणाले?
- अनेक आंदोलनकर्ते पहिल्यांदा मुंबईत आले आहेत.
- मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर गाड्या हटवण्यात आल्या आहेत.
- राज्य सरकारकडून महाधिवक्ता सराफ काय म्हणाले?
- राज्य सरकारकडून घेण्यात आलेले प्रतिज्ञापत्र सादर...
- राज्य सरकारकडून महाधिवक्ता सराफ काय म्हणाले
- आम्ही घोषणा केल्या आणतात सगळीकडे बॅनर लावले आहेत. LED screen लावण्यात आल्या आहेत.
- आणि त्यानंतर लोक कमी झाली आहेत.
- काही भागात अजूनही मोठ्या प्रमाणात वाहन आहे.
- काही लोक ऐकत आहेत, तर काही अजिबात ऐकत नाही आहेत.
- काल रात्रीपासून पोलीस रस्त्यावर असून आम्ही आंदोलनकर्त्यांना विनंती करत आहोत.
- जरांगे पाटील यांना नोटीस देण्यात आली असून आम्ही त्यांना जागा खाली करायला सांगितलं आहे.
- जरांगे यांनी लिखित स्वरूपात किंवा लोकांना आवाहन करून आंदोलनकर्त्यांना मुंबई सोडण्यास सांगावं.
- लोक तिथेच थांबली तर अडचण होईल.
- आम्ही अद्याप कोणतीही कठोर कारवाई केली नाही.
राज्य सरकारच्या भूमिकेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
- तुम्ही आधीच कोर्टात यायला हवं होतं
- ही तुमची चुकी आहे.
- कोर्टाने सरकारची खरडपट्टी काढली.
- तुम्ही देखील आमच्या आदेशाच उल्लंघन केलं.
- 50 हजारांपेक्षा जास्त लोक होती, तोवर तुम्ही काय करत होता?
- तुम्ही जर 24 तासांनी संतुष्ट नव्हता, तर तुम्ही देखील कोर्टात यायला हवं होतं. उच्च न्यायालयाने आंदोलनकर्त्यांच्या वकिलांना बजावलं.
मनोज जरांगेंचे वकील सतीश मानेशिंदे काय म्हणाले?
- ३१ मे ला आम्ही पहिला अर्ज केला.
- २५ जुलैला दुसरा अर्ज केला. त्यानंतर आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक केली मात्र आम्हाला गाड्या पार्क करायला जगा दिली नाही. आता तुम्ही म्हणू शकत नाही की पूर्वकल्पना दिली नाही.
- ती जागा सत्याग्रहासाठी आहे का?, तर हो
- 5000 हजार लोकांना परवानगी होती का? तर हो...
उच्च न्यायालय काय म्हणाले?
- आम्ही सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यास तयार
- मनोज जरांगेंचे वकील सतीश मानेशिंदे काय म्हणाले?
- आम्ही लोकांना खाली करण्यास सरकारला सहकार्य करण्यास आणि गाड्या काढण्यास सांगितलं आहे.
- कायदा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचं आवाहन करण्यात आलं आहे.
उच्च न्यायालयाने कोणता निकाल दिला?
उद्या १ वाजेपर्यंत (2 सप्टेंबर) सुनावणी तहकूब