Manoj Jarange Patil :  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेलं आमरण उपोषण आज संपलं आहे. मराठा समितीने हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) मान्य असल्याचं सांगितलं आहे. त्यानुसार गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं समितीनं मान्य केलं आहे. यानंतर मनोज जरांगे पाटील मुंबईत न थांबता उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं रवाना झाले आहेत. ॲम्बुलन्समधून त्यांना संभाजीनगरमध्ये नेण्यात येत आहे. दरम्यान, त्यांच्या तब्बेतीबाबत डॉक्टर विनोद चावरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. 

तब्बेतीत सुधारणा होण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो

उपोषणामुळं मनोज जरांगे पाटील यांनी प्रचंड थकवा जाणवत आहे. तसेच त्यांची स्थिती नाजूक असल्याची माहिती डॉक्टर विनोद चावरे यांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या तब्बेतीत सुधारणा होण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो अशी माहिती देतील चावरे यांनी दिली आहे. डॉक्टर विनोद चावरे हे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत ॲम्बुलन्समधून छत्रपती संभाजीनगरकडे जात आहेत

मराठा समितीने हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) मान्य असल्याचं सांगितलं आहे. त्यानुसार गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं समितीनं मान्य केलं आहे. या मागण्यांच्या संदर्भातील जीआर देखील सरकारनं काढला आहे. सरकारचा मसुदा अभ्यासकांना देखील मान्य झाला आहे. दरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री उदय सामंत, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं आहे.

उपोषण सुटल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझी लेकरं सुखी राहतील, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांचं कल्याण झाल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा सुवर्णक्षण असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. याआधी विदर्भात आणि खानदेशात आपण नोंदी दिल्या असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. 

मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या मान्य?

हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीसाठी शासन निर्णय - मान्यआंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत - मान्यआंदोलनातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी - मान्यमराठा आंदोलकांवरील केसेस मागे - मान्यप्रलंबित जात पडताळणीला मान्यता - मान्य आंदोलकांवरील गुन्हे घेण्यास मान्यता - मान्य

मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या प्रलंबित?

सातारा गॅझेट अंमलबजावणीसाठी - 1 महिन्याची मुदतमराठा-कुणबी एकच शासन निर्णय - 2 महिन्यांची मुदत

महत्वाच्या बातम्या:

माझी लेकरं सुखी राहतील, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांचं कल्याण झालं, उपोषण सोडल्यानंतर काय म्हणाले जरांगे पाटील?