Eknath Shinde : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी पाच दिवस उपोषण केले. सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. आम्ही सुरुवातीपासून सकारात्मक होतो. कायदा टिकला पाहिजे याबाबत आम्ही विचार केल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. मराठा समाजावर अन्याय होऊ नये, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमीका असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
चर्चा करुनच आम्ही मोठा निर्णय घेतला
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी केली होती. त्या कमिटीतीली सगळ्यांचे अभिनंदन करतो असे शिंदे म्हणाले. सर्वंकष चर्चा करुन मोठा निर्णय घेतला आहे. सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेटबाबत मागण्या होत्या त्या पूर्ण केल्या असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. पूर्ण प्रमाणपत्र मिळणे अधिक सुलभ होणे अशी मागणी होती. तीन सदस्यांची समिती गठीत केली असून तत्काळ कार्यवाही करण्यात येणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
सातारा गॅझेटसाठी थोडा अवधी लागणार आहे
सातारा गॅझेटसाठी थोडा अवधी लागणार आहे, ते त्यांना सांगितले आहे. मराठवाडा म्हणजेच हैदराबाद गॅझेटबाबत तात्काळ निर्णय घेण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणवर आणखी मागणी होती. यामध्ये आंदोलना दरम्यान ज्यांचा मृत्यू झाला त्यांना 10 लाख आणि नोकरी देण्याबाबत मी मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला होता. त्याचा अनेकांना लाभ दिला आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात पुढील कार्यवाही होईल असेही ते म्हणाले.
जस्टिस शिंदे समितीला 58 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यातील 30 लाख प्रमाणपत्र दिले आहेत. मी शिवरायांची शपथ घेऊन सांगितले की मराठा समाजाला आरक्षण देणार आणि ते दिले आणि टिकवले आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले. आता ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे मंत्रींमंडळ आहे त्यांनी सगळ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. समाजावर अन्याय होऊ नये आणि मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमीका असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
कार्यपद्धती सोपी असली पाहिजे आणि प्रमाणपत्र मिळाले पाहिजे ही सरकारची भूमिका
एमपीएससी यूपीएससीला फायदा होत आहे परदेशी उच्च शिक्षण घेणारे यांना देखील याचा लाभ होत आहे अनेक निर्णय घेतल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. कुठलाही निर्णय घेताना तो कायदेशीर असला पाहिजे तो टिकला पाहिजे असे शिंदे म्हणाले. सातारा गॅझेट आहे त्यात काही त्रुटी आहेत त्यावाबात निर्णय लवकर होईल असेही शिंदे म्हणाले. आता जी काही मागणी आहे ती हैदराबाद गॅझेटमध्ये तपासणी होईल. कार्यपद्धती सोपी असली पाहिजे आणि प्रमाणपत्र मिळाले पाहिजे ही भूमिका सरकारची आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले.
जीआर कायद्याच्या चौकटीत बसणारा
जो जीआर काढला आहे तो कायद्याच्या चौकटीत बसणारा आहे. प्रमाणपत्र देण्याची पद्धत सुलभ आहे, त्यामुळे कोणी आक्षेप घेण्याची गरज नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. विरोधी पक्ष नेहमी विरोध करत असतो. सरकार अडचणीत येते का बघत असतात. पण त्यांना काही जमले नाही, आमचे सरकार यावर ठाम होतो. मनोज जरांगे गेल्या दोन वर्षापासून लढत आहेत संवेदनशील आहेत असे एकनाथ शिंद म्हणाले. ओबीसी समाज नाराज होणार नाही, कारण त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी मुख्यमंत्री फडणवीस आणि आम्ही घेतली आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: