मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईत (Mumbai) धडक दिलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना रोखण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारकडून शर्थीच प्रयत्न सुरु आहेत. मनोज जरांगे यांची पायी दिंडीयात्रा नवी मुंबईत वाशीमध्ये पोहोचली आहे. याठिकाणी हजारो मराठा बांधवांचा जनसागर उसळला आहे. हा ताफा मुंबईत आझाद मैदानाच्या दिशेनं येऊ नये यासाठी सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाच ते सहा अध्यादेश देण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये बहुंताश मागण्या मान्य करण्यात आल्याची माहिती आहे. मनोज जरांगे वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा घेऊन समाजाला माहिती देणार आहेत. त्यामुळे मागण्या झाल्या आहेत की नाही? हे आता जरांगे यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर समजणार आहे. 

Continues below advertisement

दरम्यान,सरकारने दिलेल्या अध्यादेशात कोणते प्रस्ताव असू शकतात? याबाबत माहिती समोर आली आहे. 

Continues below advertisement

काय असू शकतात अध्यादेश?

  • कुणबी नोंदी सापडलेल्या लोकांच्या वंशावळीतील प्रमाणपत्र देण्याचा निर्णय?
  • रक्ताच्या नातेवाई आणि सगे सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याबाबत निर्णय?
  • दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत निर्णय?
  • फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या अधिवेशनात आद्यदेशाचे कायद्यात रूपांतर ?

इतर महत्वाच्या बातम्या