Manoj Jarange Patil Beed: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांनी मराठ्यांचा नाद सोडावा,  मराठ्यांच्या वेदना तुम्हाला नाही समजणार. मी सगळ्यांकडे पाहणार आहे. जे आरक्षणाच्यामध्ये आले त्यांचा कार्यक्रम होणार, मग तो कोणीही असो. गेल्या  लोकसभेलाही त्याचा हिसका आपण दाखवला आहे. गोडीत रहा, मात्र आरक्षणाच्या विरोधात गेलात तर त्याला राजकीय सत्तेचा फायदा घेवू देणार नाही, असा घणाघात मनोज जरांगे (Manoj Jarange Patil)  यांनी करत परत एकदा देवेंद्र फडणवीस  यांच्यावर हल्लाबोल केला आहे.


 देवेंद्र फडणवीस तुमची मनमानी एकूण घेणार नाही 


देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांचे आमदार मराठ्यांच्याच विरोधात घातले आहेत. रोज एक आमदार आमच्या विरोधात बोलत आहे. विरोधक म्हणतात फडणवीस यांना बोलू नका, मात्र ते सत्तेत आहे. त्यामुळे त्यांनाच मी बोलतो आहे. त्यांनी सत्तेतून बाहेर जावं एक शब्द सुद्धा मी त्यांना बोलणार  नाही. भाजप मधील मराठ्यांना आरक्षण लागणार नाही का? काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी ला आरक्षण लागणार नाही का? शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा, तो कधीही आत्महत्या करणार नाही. पण तुम्ही जे त्यांना पाहिजे ते देत नाही, पण 1500 रुपये देता लाडक्या बहिणीला.


देवेंद्र फडणवीस तुमची मनमानी एकूण घेणार नाहीत. तुमच्या हट्टापाई आमचे लेकरं मारायला निघालेत, तुम्ही आम्हाला तडपायला लावू नका, मराठ्याच्या अंत पाहू नका, नाहीतर महाराष्ट्र तुम्हाला पाय ठेऊ देणार नाहीत. असा इशाराही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. 


देवेंद्र फडणवीस यांना फक्त मराठ्याच्या जीवावर सत्ता लागते


मराठा-कुणबी एका असताना 2004 चा कायदा तूम्ही रद्द केला. आम्हाला कुणबी नोंदी दिल्या जात नाहीत. जातीवाद नेमका कुणी केला आणि तुम्ही कुणाला जातीवाद शिकवता? माझ्या नादाला लागू नका, समाज उठला तर पळायला जागा भेटणार नाही. अशी टीकाही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना फक्त मराठ्याच्या जीवावर सत्ता लागते. तर महाविकास आघाडीला पण फिरू देणार नाहीत,मराठा आमदार फडणवीस यांचे एकूण आरक्षणाच्या विरोधात बोलत आहेत. सत्तेतला एकही मंत्री आपल्या बाजूने बोलत नाही.


फडणवीसांनी मराठ्याच्या आमदारांना मराठ्याच्या विरोधात घातलं आहे. समाज बांधवांनी आता शहाणे व्हावे. शेवटचा घटका सुद्धा माझ्या समाजाच्या पायावर मोजायची वेळ आली आहे. मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणीस यांना बोलू नका असा हट्ट आहे, मी त्यांनाच बोलणार. कारण सत्तेत असणाऱ्यालाच  मागणी केली जाते, विरोधकांना नाही. मी चुकत असेल तर मला सांगा आंदोलनातून बाहेर जायला मी तयार आहे. असेही मनोज जरांगे म्हणाले.  


हे ही वाचा