Manoj Jarange Patil :  मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण करावा. आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नका. शिंदे समितीला मुदतवाढ दिली, मात्र समिती काम करत नाही, समाजाला फसवू नका असे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. मराठ्यांच्या आमदारांना सांगतो तुम्हाला समाजाने मतं दिली आहेत. आरक्षणाचा विषय लावून धरा, मराठ्यांच्या मतांचा आदर राखा. प्रश्न मांडला नाही तर गावा गावात परिणाम दिसतील असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. सगळ्या विद्यार्थ्यांसाठी SCBC लागू करा, OBC  धरतीवर लागू करा, मुलींना मोफत शिक्षण लागू करा असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. छगन भुजबळ जातीय विष पेरुन अजित पवार यांना अडचणीत आणत आहेत. ते जन्मल्यापासून मराठा आरक्षणासाठी आडवे येत असल्याची टीकाही जरांगे पाटील यांनी केली. 


राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांच्यावर कारवाई का होत नाही


महापुरुषांबद्दल वाईट बोलणाऱ्यांवर कारवाई होत नाही. राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांच्यावर कारवाई का होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या सगळ्यांना धडा शिकवणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. महापुरुषांची विटंबना करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. सरकारने हा कायदा नव्याने अधिवेशनात परित करावा असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. 


भुजबळ कोणत्याही प्रकरणाला जातीचा रंग देतात


महान व्यक्ती (छगन भुजबळ) संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासाठी काही बोलले नाहीत. मात्र जातीवाद करतात. येवल्याच्या नेत्याला जातीच विष कालवायचं आहे. कोणतेही कागद घेऊन इवळतो. छगन भुजबळ जातीय विष पेरुन अजित पवार सरकारला अडचणीत आणत आहेत. तुमचे वय काय झालं? बोलता काय? असा सवाल करत मनोज जरांगे यांनी भुजबळांवर टीका केली. परळीत आमच्या जातीच्या माणसाला दुसऱ्या जातीच्या लोकांनी मारहाण केली आहे. आम्ही जातीचं वळण दिलं नाही. तुम्ही आमचे काढा आम्ही तुमचे व्हिडिओ काढणार आहोत. भुजबळ जन्मल्यापासून मराठा आरक्षणासाठी आडवे येतात. सगळ्या जातीचं आरक्षण घेतात. कोणत्याही प्रकरणाला जातीचा रंग देतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांना विनंती आहे की, देव देवतांची विटंबना करणाऱ्याला शोधा आणि त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करा असे जरांगे म्हणाले. 


अनिल परब यांच्यावरही टीका


तुम्ही सरकार म्हणून, पोलीस प्रशासन म्हणून कडक भूमिका घ्या. एका व्यक्तीला सळईने चटके दिले आहेत. आम्ही चटके देणाऱ्यांचं समर्थन करणार नाही. खोक्याला शिक्षा झालीच पाहजे असे मनोज जरांगे म्हणाले. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर देखील मनोज जरांगे यांनी टीका केली. छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर तुलना केल्यानं अनिल परब यांच्यावर जरांगेंनी टीका केली. तुम्हाला लोक चांगले म्हणत होते, आता तुम्ही वाईटाकडे जात आहेत. संभाजीराजेंबरोबर तुलना करणे योग्य नाही.  त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी असे जरांगे म्हणाले.



महत्वाच्या बातम्या:


राजकीय हेतूसाठी दुसऱ्यांदा देशमुख कुटुंबाचा बळी घेऊ नका, मुख्यमंत्री छक्के पंजे करतायेत, मनोज जरांगेंचा हल्लाबोल