Manoj Jarange Patil : आमचे लोक शेतकरी असून, घाम गाळून पैसे कमावतात. आमच्याकडील 123 गावांनी सभेचा सगळा खर्च उचलला होता. सर्वांनी मिळून सभेचा खर्च केल्याची माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सांगितली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे मोठ्या राजकीय नेत्याचा हात असल्याचा आरोप केला जातोय, यासंदर्भात देखील त्यांना विचारण्यात आलं. यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, माझ्या मागे सर्वसामान्य मराठ्यांचा हात आहे. ज्यांना आरक्षणाची गरज आहे, त्यांचा हात माझ्या आंदोलनामागे आहे. हा हात कोणालाच उचलणार नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे एबीपी माझाच्या झिरो अवर या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आंदोलनाच्या संदर्भात विविध मुद्दे मांडले. समाजाचं काम करत असताना झोकून देऊन काम करायचे असते. मी घेतलेल्या ध्येयापासून माघार घेणार नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले. आरक्षणासंदर्भात जो निर्णय होईल तो सर्वसामान्य मराठ्यांसाठी होणार आहे. आरक्षण मिळत असेल तर कोणी आडकाठी घालू नये असे जरांगे पाटील म्हणाले.
आमचे आंदोलन हे पैशासाठी नाही तर न्यायासाठी
लोक ज्यावेळी आमच्या आंदोलनावर चुकीच्या प्रतिक्रिया देतात, त्यावेळी वाईट वाटते असेही जरांगे पाटील म्हणाले. आम्ही फक्त 22 गावांचे पैसे वापरले आणखी 101 गावांचे पैसे शिल्लक आहे. आम्ही ते वापरले नाहीत. आम्हाला जर पैसाच कमवायचा अलता तर, ते पैसे घेतले असते. आमचे आदोलन हे पैशासाठी नाही तर न्यायासाठी आहे. 21 लाखांमध्ये आमचा कार्यक्रम पार पडल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
आम्हाला आरक्षण देणार नसेल आमच्याकडून वेळ का घेतला?
सरकार जर आम्हाला OBC मधून आरक्षण देणार नसेल तर त्यांनी आमच्याकडून ४० दिवसांचा वेळ कशासाठी घेतला आहे. समिती कशासाठी गठीत केली आहे. असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. आम्ही पूर्वीपासून ओबीसीमध्ये आहोत तुम्ही फक्त आमची संख्या मोजा असेही जरांगे पाटील म्हणाले. विदर्भातील, खान्देशातील सगळा मराठा समाज ओबीसीमध्ये आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्र नाशिकचा पट्टा मराठा ओबीसी आरक्षणात आहे, कोकणचा काही भाग देखील ओबीसी मराठा आरक्षणात आहे. मराठवाड्यातील राहिलेल्या समाजाला ओबीसीमध्ये का आरक्षण मिळत नाही असे जरांगे पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: