Maratha Reservation Bill : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मसुद्याला (Maratha Reservation Bill) मंजुरी देण्यात आली. त्यानंतर विधिमंडळात मराठा आरक्षणाचे विधेयक मांडण्यात आले. मराठा आरक्षणाच्या विधेयकाचा मुसदा एकमताने मंजूर करण्यात आला. मात्र मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी ओबीसीमधून (OBC) मराठा आरक्षणावरच ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. तसेच त्यांनी आता स्वतःवरील उपचार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


मनोज जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवला म्हणूनच त्यांना सहा महिन्यांचा महिन्याचा वेळ दिला. प्रत्येकवेळी भावनेच्या आहारी जाऊन आमच्या लेकरांचं वाटोळं होऊ देणार नाही. आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला मिळाले पाहिजे. हरकतीचा विषय पुढे करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा हे बरोबर नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 


उपचार बंद, सलाईन काढून फेकले


आम्ही वेळ दिलाय, संयम ठेवलाय, हरकतीसाठी तुमच्याकडे यंत्रणा आहे. उद्या 12 वाजता आंतरवालीमध्ये निर्णायक बैठक होणार आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरवली आहे. तसेच मी स्वतःवरील उपचार आता बंद करत आहे असे म्हणत त्यांनी सलाईन काढून फेकले आहे. जे आरक्षण आम्हाला हवं आहे ते आम्ही मिळवणारच, असेही त्यांनी म्हटले आहे.  


...तर बोंबलत बसायचं का?


मुख्यमंत्री यांच्यावर आजवर विश्वास ठेवला आहे. आज देण्यात आलेलं आरक्षण निवडणुकीपर्यंत टिकल आणि उद्या जर उडाले तर बोंबलत बसायचं का?, आम्हाला त्या लफडयात पडायचं नाही. सरकारचे आरक्षण टिकेल की नाही माहित नाही. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, अशी आमची मागणी असल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहेत.


काय म्हणाले एकनाथ शिंदे?


आजचा दिवस कर्तव्याची जाणीव करुन देणारा आहे. ना कोणावर अन्याय, ना कोणाला धक्का असा निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री असलो तरी आंदोलकांना भेटलो. तुमच्यापेक्षा जनता मोठी आहे.  यामुळे त्यांना पहिलं भेटा असं बाळासाहेब म्हणाले होते. ⁠ एकनाथ शिंदे यांनी वेळ मारुन नेतील असं काही जण म्हणाले. मात्र शब्द देताना शंभरवेळा विचार करतो. ⁠तो मी पाळतो, ⁠असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले. 


आणखी वाचा


Maratha Reservation Bill: मराठा आरक्षण कधीपासून लागू, कुठे कुठे आरक्षण, OBC मधून का नाही?, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं!