Manoj Jarange Live : सदावर्तेंची मनोज जरांगेच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका, सुनावणी सुरू

Manoj Jarange Mumbai Rally Live Updates : आजचे दुपारचे जेवण पिंपरी-चिंचवडच्या तळेगावात केले जाणार आहे. तसेच, आजचा मुक्काम लोणावळा येथे केला जाणार आहे.

मोसीन शेख Last Updated: 24 Jan 2024 02:59 PM
Mumbai News: सदावर्तेंची मनोज जरांगेच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका, सुनावणी सुरू

Mumbai News: सदावर्तेंची मनोज जरांगेच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका


न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे तातडीची सुनावणी सुरू

Gunratna Sadavarte vs Manoj Jarange :आंदोलनाविरोधात आवाज उठवणा-यांना धमकावलं जातंय, गुणरत्न सदावर्तेंचा हायकोर्टात युक्तिवाद


या आंदोलनाविरोधात आवाज उठवणा-यांना धमकावलं जातंय. हिंसक विरोध केला जातोय. पण प्रशासन हे सारं उघड्या डोळ्यांनी पाहतंय. कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही.सदावर्तेंचा हायकोर्टात दावा

Gunratna Sadavarte vs Manoj Jarange : गुणरत्न सदावर्तेंचा हायकोर्टात युक्तिवाद, जरांगेंना मुंबईत परवानगी देऊ नका

मनोज जरांगे आणि त्यांचा समर्थकांना मुंबईत आंदोलनाची परवानगी न देण्याची मागणी. जरांगे ज्या मार्गानं मुंबईकडे निघालेत ती ती शहरं त्यावेळी बंद करावा लागली. आज पुण्यात लोकांना या आंदोलनाचा फार त्राल झालाय. शाळा, कॉलेजं, दुकानं बंद करावी लागली. काही तासांत जरांगे आपल्या ताफ्यासह ठाण्यात पोहचतील. हजारो बैलगाड्या, ट्रैक्टर शहरात आली तर ट्राफिकची काय अवस्था होईल, गुणरत्न सदावर्तेंचा हायकोर्टात युक्तिवाद सुरू

Gunratna Sadavarte vs Manoj Jarange : गुणरत्न सदावर्तेंची मनोज जरांगेविरोधात याचिका, हायकोर्टात तातडीची सुनावणी सुरु

गुणरत्न सदावर्तेंची मनोज जरांगेच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका, न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे तातडीची सुनावणी सुरू

 Manoj Jarange : जरांगेंच्या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न; सदवार्तेंचा आरोप

 Manoj Jarange Live : मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये येत असून, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्यासाठी हायकोर्टात आम्ही गेलेलो आहोत. पुण्यामध्येही तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता काही वेळात यावरती हायकोर्टात सुनावणी होईल. मुंबईत येण्यापासून रोखला जावा यासाठी आम्ही हायकोर्टात मागणी करत असल्याचे सदावर्ते म्हणाले. 

२५ आणि २६ जानेवारीला एपीएमसी दोन दिवस बंद राहणार

नवी मुंबई - महाराष्ट्र मधून येणाऱ्या लाखो मराठा बांधवांचा २५ तारखेला रात्री नवी मुंबईत  मुक्काम होणार आहे. मोठ्या संख्येने येणाऱ्या मराठा बांधवांच्या सोईसाठी आडावा बैठक झाली. बैठकीला एपीएमसी मधील व्यापारी , माथाडी कामगार , पोलीस , पालिका प्रशासन , मराठा समन्वयकांची उपस्थिती होती. 


एपीएमसी मार्केट मध्ये मोठा मुक्काम… 25  जानेवारी रोजी एपीएमसी बंद राहणार आहे. एपीएमसी , शहरातील सर्व मैदानांवर , मोकळ्या जागेवर पार्किंग केली जाणार आहे. २५ आणि २६ जानेवारीला एपीएमसी दोन दिवस बंद राहणार

Manoj Jarange Patil : मुंबईतील मराठा वादळाची धडकी पुण्यामध्येच भरली; मनोज जरागेंच्या पदयात्रेत लाखोंचा जनसमुदाय अवतरला!

Manoj Jarange Rally in Pune : मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा पुण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. पुण्यामध्ये आज मनोज जरांगे पाटील यांच्या यात्रेत अभूतपूर्व गर्दी झाली आहे.


https://marathi.abplive.com/news/pune/pune-hit-by-the-maratha-storm-along-wit-manoj-jarange-patil-jarange-march-attended-by-lakhs-of-people-maratha-reservation-1249774

Manoj Jarange : मोर्चाचा आजचा पाचवा दिवस

मराठा आरक्षणाच्या मागणीसह ओबीसी प्रमाणपत्र आणि इतर मागण्या घेवून मनोज जरांगेंनी मुंबईकडे कूच केलीये. या मोर्चात शेकडोच्या संख्येने मराठा बांधवही सहभागी झाले.  जालनाच्या अंतरवाली सराटीतून निघालेला मोर्चा बीडवरुन, अहमदनगरमार्गे पुण्यात दाखल झाले. या मोर्चाचा आजचा पाचवा दिवस आहे. हा मोर्चा आता मुंबईपासून अवघ्या काही किलो मीटरवर आहे. 

Manoj Jarange : 25 जानेवारीला मोर्चा नवी मुंबईत धडकणार

मराठा आरक्षणाच्या निर्णायक लढाईसाठी मनोज जरांगे पाटील आणि हजारो मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. त्यांचा मोर्चा मुंबईत दाखल होईल तेव्ह मनोज जरांगे यांच्यासोबतच्या मराठा आंदोलकांची संख्या ही काही लाखात जाईल, असा अंदाज आहे. गुरुवार 25 जानेवारी रोजी हा मोर्चा नवी मुंबईत धडकणार आहे. त्यावेळी मराठा आंदोलकांच्या मुक्कामाची सोय ही नवी मुंबईत करण्यात आली आहे. नवी मुंबईतली मैदानं, सामाजिक सभागृहं, शाळा, एपीएमसी मार्केट या ठिकाणी मराठा आंदोलकांच्या निवासाची, जेवणाची आणि त्यांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी नवी मुंबई महापालिका, सिडको आणि पोलीस प्रशासनाकडून सहाय्य मिळावं असं आवाहन मराठा समन्वयकांकडून करण्यात आलं आहे.

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या यात्रेदरम्यान नवी मुंबईत वाहनांवर रोख; 26 जानेवारी रात्री 11 पर्यंत अवजड वाहनांना बंदी

 मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)  मागणीसाठी मनोज जरांगेंची (Manoj Jarange)  पदयात्रा 25 जानेवारी रोजी नवी मुंबई (Navi Mumbai) पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येत आहे. त्या पार्श्वभूमीवर 25 जानेवारी रात्री 12 ते 26 जानेवारीला रात्री 11 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याशिवाय वाहनं उभी करण्यास तसंच शहरातील सर्व मार्गावरुन मार्गस्थ होण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. मात्र ही अधिसूचना अत्यावश्यक सेवेला लागू नसेल. 


आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांचे वादळ जरांगे पाटलांसह मुंबईच्या दिशेने सरकते आहे. मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा आज पाचवा दिवस आहे. जरांगेचा आज लोणावळ्यात मुक्काम असणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार जरांगेंनी केला आहे. आरक्षणासाठी गोळ्या झेलायलाही तयार आहे असा थेट इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिला आहे.  समाजासाठी थोडा त्रास सहन करावा, सर्व जाती धर्मातील मुंबईच्या लोकांना हात जोडून अवाहन आहे. शांततेत आमरण उपोषण करणारच, समाजासाठी मी माझ्या जीवाची पर्वा करत नाही. मी मरायला सुद्धा भीत नाही, असेही जरांगे म्हणाले.  

Manoj Jarange : राज्य सरकारचा तीन कलमी प्रस्ताव मनोज जरांगे पाटलांनी फेटाळला

छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड आणि जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय काल रात्री रांजणगाव गणपती येथे आले होते. अडीच तासांनंतर त्यांना वेळ मिळाली. त्यानंतर पहाटे चार वाजता चर्चेला सुरुवात झाली. दीड तास चर्चा झाली. चर्चेदरम्यान राज्य सरकारचा तीन कलमी प्रस्ताव अधिकारी जरांगे पाटील यांच्यासमोर ठेवला.  


या प्रस्तावात 


१) ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या ही सकारात्मक बाब असल्याचे मान्य व्हावे. 


२) गावागावात आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरू झाले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 


३) क्युरेटिव्ह पिटीशनवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, त्यातून आरक्षणाला दिशा मिळणार आहे. म्हणून मुंबईचा दौरा टाळा असेही आवाहन अधिकाऱ्यांनी केले.


जरांगे पाटील मात्र आपल्या भुमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे साडेपाच वाजण्याच्या सुमारास सरकारचे प्रतिनिधी तेथून बाहेर पडले.

ओबीसी- मराठा आरक्षणाच्या वादात मध्यस्थी करायला तयार; प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

Manoj Jarange : सरकारचा तीन कलमी प्रस्ताव मनोज जरांगे पाटलांनी फेटाळला आहे. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड आणि जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडून हा प्रस्ताव देण्यात आला होता... संपूर्ण बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...


https://marathi.abplive.com/news/mumbai/maratha-reservation-big-news-manoj-jarange-patal-rejected-the-government-three-point-proposal-marathi-news-1249762

Manoj Jarange : नाशिकहून मराठा आंदोलक पुण्याच्या दिशेने

 मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकहून मराठा आंदोलक पुण्याच्या दिशेने निघत आहेत. आंदोलनात सहभागी होणाऱ्या मराठा आंदोलकांना नाशिकहुन रसद पुरवठा केला जाणार आहे, हजारो किलो डाळ, तांदूळ, शेंगदाणे, हजारो लिटर तेलासह अन्नधान्य भरलेले ट्रक्स घेऊन आंदोलक पुण्यामार्गे मुबंईत दाखल होणार आहेत. आज जरांगे पाटील यांच्यासह पुण्यात मुक्काम असणार आहे. 

Manoj Jarange : ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणावर मध्यस्थी करण्यास तयार ; प्रकाश आंबेडकर  

धाराशिव- आरक्षणाच्या आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन मराठा व ओबीसी मराठा व ओबीसी समाज उभा ठाकला आहे. या दोन्ही समाजात मी मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 


मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सर्वसामान्य मराठ्यांचा असून त्यांनी सरकारला जेरीस आणलं आहे, त्यांनी लोकसभा निवडणुकीपर्यंत निजामी मराठे यांच्यापासून सावध राहायला हवं,  यांच्यापासून सावध राहायला हवं ते घात करतील प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे.

ओबीसी- मराठा आरक्षणाच्या वादात मध्यस्थी करायला तयार; प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

ओबीसी- मराठा आरक्षणाच्या वादात मध्यस्थी करायला तयार; प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य


https://marathi.abplive.com/news/dharashiv/prakash-ambedkar-big-statement-on-reservation-case-ready-to-mediate-in-obc-maratha-reservation-dispute-marathi-news-1249739

Manoj Jarange : जरांगेंच्या मुंबई आंदोलनाविरोधातील याचिकेवर तातडीची सुनावणी

Maratha Reservation : मुंबईतील मराठा आंदोलनाविरोधातील याचिकेवर आज दुपारी हायकोर्टात तातडीची सुनावणी होणार आहे. मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारण्याची मागणी तसेच जरांगे आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती. 

Manoj Jarange : शेकोट्या पेटवून लोकं जरांगेची वाट पाहत होते...

Manoj Jarange Mumbai Rally Live Updates : बाहेर कडाक्याची थंडी रस्त्यावर लोकांच्या दुतर्फा रांगा, थंडीतून सुटका मिळावी म्हणून लोकांनी शेकोट्या पेटवलेल्या आणि शेकोट्या पेटवून लोकं जरांगेची वाट पाहत असल्याचे चित्र रात्री पाहायला मिळाले. 

पार्श्वभूमी

Manoj Jarange Mumbai Rally Live Updates : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार आहे. यासाठी मनोज जरांगे 20 जानेवारीपासून मुंबईच्या दिशेने निघाले आहे. त्यांच्या याच मुंबई आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे.  मनोज जरांगे यांनी काल रात्री पुण्याच्या चंदननगर येथे मुक्काम केला आहे. तर, आज सकाळी पुन्हा 10 वाजता जरांगे मुंबईच्या दिशेने निघणार आहे. तर आजचे दुपारचे जेवण पिंपरी-चिंचवडच्या तळेगावात केले जाणार आहे. तसेच, आजचा मुक्काम लोणावळा येथे केला जाणार आहे. विशेष म्हणजे जरांगे हे आपल्या मुंबई आंदोलनावर ठाम असून, मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नसल्याचे त्यांनी म्हटले आहेत. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.