आता थांबत नाही! मनोज जरांगे मुंबई आंदोलनावर ठाम; मराठा आरक्षणाची प्रत्येक Live अपडेट
Manoj Jarange Mumbai Rally : तीन दिवसांचा प्रवास करून जरांगे आज सकाळी पुन्हा लाखो मराठ्यांसह मुंबईकडे निघाले आहेत.
मोसीन शेख Last Updated: 23 Jan 2024 01:35 PM
पार्श्वभूमी
Manoj Jarange Mumbai Rally : ओबीसीमधून मराठा आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम असून, यासाठी ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. जरांगे यांच्या पायी दिंडीचा आजचा चौथा दिवस आहे. तर 26 जानेवारीला...More
Manoj Jarange Mumbai Rally : ओबीसीमधून मराठा आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम असून, यासाठी ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. जरांगे यांच्या पायी दिंडीचा आजचा चौथा दिवस आहे. तर 26 जानेवारीला जरांगे मुंबईत धडकणार आहे. तीन दिवसांचा प्रवास करून जरांगे आज सकाळी पुन्हा लाखो मराठ्यांसह मुंबईकडे निघाले आहेत. तर, आज दुपारच भोजन भीमा कोरेगाव येथे केले जाणार आहे. तसेच, आजचा मुक्काम पुणे जिल्ह्यातील चंदननगर येथे केला जाणार आहे. मुंबई आंदोलनाच्या तीन दिवसांचा दिनक्रम...23 जानेवारी (मंगळवार)दुपारी भोजन - कोरेगावं भीमारात्री मुक्काम - चंदननगर ( खराडी बायपास ) पुणे24 जानेवारी (बुधवार)पुणे शहर प्रवास - जगताप डेअरी - डांगे चौक - चिंचवड - देहूफाटारात्री मुक्काम - लोणावळा25 जानेवारी (गुरुवार)दुपारी भोजन - पनवेल.रात्री मुक्कामी - वाशी26 जानेवारी (शुक्रवार)चेंबूर वरून पदयात्रा निघेल आणि आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कवर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होणार आहे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
काय सांगता! हुबेहूब मनोज जरांगे..; पुण्यातील बाप-लेकाने उभारला जरांगेंचा मेणाचा पुतळा
Manoj Jarange Statue : पुण्यातील एकविरा कार्ला येथे वॅक्स मूजियममध्ये मनोज जरांगे पाटलांचा मेणाचा पुतळा साकारण्यात आलाय. अशोक म्हाळसकर आणि ऋषी म्हाळसकर या बाप लेकांनी हा मेणाचा पुतळा तयार केला आहे. यासाठी त्यांना तीन महिन्यांचा वेळ लागला. मनोज जरांगे पाटील यांच्या परवानगीने हा पुतळा उभारण्यात आला असून, पुतळ्याची उंची पाच फूट सात इंच इतकी आहे.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...