Manoj Jarange Mumbai March Live Update : मनोज जरांगे पुन्हा आंतरवालीत, मराठवाड्यातील इंटरनेट सेवा बंद, मराठा आंदोलनाची प्रत्येक अपडेट...

Manoj Jarange Mumbai Protest : आक्रमक झालेले मनोज जरांगे मुंबईकडे निघाले असताना, त्यांनी आपला ताफा पुन्हा माघारी वळवत आंतरवाली गाठलं.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Feb 2024 01:15 PM
जरांगे सागर बंगल्यावर येत असतील तर आम्ही सर्व आमदार सागर बंगल्याबाहेर उभे राहू : भरत गोगावले

जरांगे आतापर्यंत मॅनेज होत नव्हतं असं वाटत होतं पण आता जी भाषा बोलत आहेत त्यावरून ते मॅनेज झाले आहेत असं वाटतंय. जरांगेच्या मागे पवार आणि ठाकरे कुटुंबीय आहेत कारण ज्यांना एकनाथ शिंदेंना पराभूत करता आलं नाही ते आता जरांगेंना पुढे करत आहेत . जर जरांगे सागर बंगल्यावर येत असतील तर आम्ही सर्व आमदार सागर बंगल्याबाहेर उभे राहू. मी विनंती करतो आता त्यांनी थांबावं पाणी नाकापर्यंत पोहचलं आहे, असं भरत गोगावले म्हणाले.

Iternet Service Closed In Marathwada : मराठवाड्यातील 'या' भागात इंटरनेट सेवा बंद...

Manoj Jarange Protest : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर देखील याबाबत अनेक पोस्ट, व्हिडिओ, फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा आदेश काढण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 10 तास बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी हे आदेश काढले आहेत. 

मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील आंबड तालुक्यात संचारबंदी
Maratha Protest : संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद; एसटी सेवाही बंद राहणार

Maratha  Protest : मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राज्यभरात आंदोलक देखील आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी एसटी बस पेटवून देण्यात आल्याची देखील घटना समोर येत आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गृह विभागाने  हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 10 तास बंद राहणार आहे. याबाबत गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी आदेश काढले आहेत. 

तिर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवून दिली, मराठा आंदोलक आक्रमक

जालना-घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. तिर्थपुरी गावात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास अंबड येथून रामसगावकडे जाणाऱ्या अंबड आगाराच्या या बसला आडवून अज्ञातांनी पेटवून दिले आहे. 

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या सहकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड

Manoj Jarange Mumbai Protest : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबईकडे (Mumbai) निघालेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या विरोधात आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिसांकडून मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांची धरपकड सुरू झाली आहे. रविवारी रात्री पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांसह एकूण 5 लोकांना ताब्यात घेतले आहे.

मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील आंबड तालुक्यात संचारबंदी

Manoj Jarange Mumbai March Live Update  : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात थेट संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहे. त्यामुळे या परिसरात आता मराठा आंदोलकांना मनाई असणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. मनोज जरांगे सध्या भांबेरी गावात असून, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक एकत्रित येत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. 

पार्श्वभूमी

Manoj Jarange Mumbai Protest : आक्रमक झालेले मनोज जरांगे मुंबईकडे निघाले असताना, त्यांनी आपला ताफा पुन्हा माघारी वळवत अंतरवाली गाठलं. पोलिसांनी जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यात संचारबंदी लागू केल्याने, जरांगे माघारी फिरले. "अंतरवलीमध्ये जाऊन पुढील निर्णय घेऊ. सर्वांनी शांतता राखावी, हट्टवादी भूमिका घेऊन मला लोकांना अडचणीत आणायचं नाही, फडणवीस तू चूक केली, सागर बंगल्यावरचं आमंत्रण देऊन दार लावून घेतोय, संचारबंदी निघू द्या मुंबईला जाईल,  अंतरवलीमध्ये जाऊन उपचार करणार, आंदोलकांना आपापल्या घरी जावं, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.


मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) रविवारी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मला मारण्याचा डाव असून, मला सलाईनमधून विष देण्यात येणार असल्याचा खळबळजनक दावा देखील जरांगे यांनी केला. फडणवीस यांना मला मारायचेच असेल तर मी त्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन मरतो असे म्हणत जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले होते. आंतरवालीपासून निघालेले जरांगे रात्री भांबेरी गावात पोहचले. मात्र, गावकऱ्यांनी त्यांना तिथेच मुक्काम करण्याचा आग्रह केल्याने जरांगे रात्री तिथेच थांबले होते. आता जरांगे पुन्हा आंतरवालीत पोहचले आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.