Manoj Jarange Chhatrapati Sambhajinagar Rally:  मराठवाड्यातील ७ जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षण शांतता रॅली आणि सभा घेतल्यानंतर आज  मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) छत्रपती संभाजीनगरमध्ये रॅलीचा समारोप करणार आहेत. सगेसोयऱ्यांसह सरसकट मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देत आद्यादेश काढण्यासाठी सरकारला दिलेला अल्टीमेटम आज संपणार आहे.


आज छत्रपती संभाजीनगरमध्ये ११.३० वाजता निघणाऱ्या रॅलीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक एकत्र येणार असून शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.


कसा असणार मनोज जरांगेंच्या रॅलीचा मार्ग?


मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण जनजागरण आणि शांतता रॅली काढतील. शहरातील सिडको चौकातून सकाळी 11.30 या रॅलीला सुरुवात होऊन नंतर क्रांती चौकात समारोप होणार आहे.


मराठा बांधवांसाठी ३०० क्विंटल जेवणाची सोय


या रॅलीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या मराठा बांधवांसाठी जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आली असून शहरातील वेगवेगळ्या 8 चौकांमध्ये तब्बल 300 क्विंटल जेवण तयार करण्यात आलं आहे.


मनोज जरांगेंच्या रॅलीसाठी शहरात जय्यत तयारी


मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या छत्रपती संभाजीनगर मधील रॅलीसाठी जयत तयारी करण्यात आली आहे. शहरातील चौकात चहा नाष्ट्याची सोय करण्यात आली असून रॅलीच्या मार्गावर 250 भोंगे, 5 हजार झेंडे तयार करण्यात आले असून शहरात ठिकठिकाणी 800 बॅनर लावण्यात आले असून 13 ठिकाणी स्वागतासाठी कमानी बांधण्यात आल्या आहेत. तसेच एकूण पाच ठिकाणी 10 एलईडी बलून हवेत सोडले जाणार आहेत.


छत्रपती संभाजीनगरच्या वाहतुकीत मोठा बदल


मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीसाठी छत्रपती संभाजी नगर शहरातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आलाय. हिराली सिडको चौक ते क्रांतीचौकापर्यंत असल्याने केंब्रिज चौक ते नगर नाका चौक तसेच कोकणवाडी चौक ते सिल्लेखाना चौक हे रस्ते बंद राहणार आहेत. यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आल्या असून जालना रोड ऐवजी शहरातील इतर पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारची मुदत आज संपणार


सगेसोयऱ्यांसह सरसकट सर्वांना आरक्षण देण्याचा अध्यादेश काढण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी 13 जुलैपर्यंत मुदत दिली होती. ही मुदत आज संपणार असून अध्यादेश दिला तर ओबीसी समाज मुंबई धडकणार असल्याचा इशारा ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दिला आहे..


हेही वाचा:


Manoj Jarange : गिरीश महाजनला वाटलं तोच हुशार आहे, पंधरा रुपयाचा बेल्ट, मनोज जरांगेंचा हल्लाबोल


फुटीर आमदार अडकले, ट्रॅपमध्ये फसले? विधानपरिषद निवडणुकीनंतर आता काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये!