Maratha Reservation Protest Suspended : मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आणि सरकारने काढलेल्या महत्त्वाच्या जीआरनंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आपलं आंदोलन संपवले असल्याची माहिती समोर येत होती. दरम्यान, असे असतानाच मनोज जरांगे यांनी एक मोठं वक्तव्य करत पुन्हा सरकारची चिंता वाढवली आहे. मराठा आंदोलन संपवत नसून त्याला स्थगिती देत असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे, मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर जरांगेंनी सरकारला 'खुटी' मारल्याची चर्चा होत आहे.

रात्री झालेल्या शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर आज सकाळी पहिली प्रतिक्रिया देतांना मनोज जरांगे म्हणाले की," आरक्षण मिळाला पाहिजे यासाठी माझ्या समाजाने खूप संघर्ष केला. आरक्षण मिळत कसं नाही यासाठी शेवटी आम्हाला मुंबईत यावं लागलं. मराठे एवढ्या ताकतीने मुंबईत आले की, या ताकतीमुळेच आज आदेश निघाला आहे. अन्यथा हा आदेश निघाला नसता. मराठे चारही बाजूंनी मुंबईत घुसू लागले आणि सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. मात्र, आंदोलन संपले नसून, आंदोलन सध्या स्थगित करण्यात येत असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.

मुंबईकडे निघताच सगेसोयऱ्यांचा आदेश निघाला

पुढे बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की," झालेला सगळा विजय मराठा समाजाचा आहे. मराठा समाजासाठी अध्यदेश निघणं ही साधीसुधी गोष्ट नव्हती. मराठ्यांनी आतापर्यंत संघर्ष केला आहे. मराठा समाज मुंबईकडे निघताच सगेसोयऱ्यांचा आदेश निघाला आहे. हा विजय माझा नसून सर्व मराठा समाजाचा आहे. सर्व गुन्हे मागे घेण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. सगेसोयऱ्यांच्या बाबतीत देखील आदेश निघाला आहे. मराठवाड्याचा गॅझेट घेतला आहे. तसेच, शिंदे समिती पुन्हा कुणबी नोंदी शोधण्याचा काम करणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. 

...अन्यथा मुंबईला आलोच समजा...

मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यावर सरकराने सगेसोयरेबाबत अध्यादेश काढला आहे. दरम्यान, यावेळी बोलतांना मनोज जरांगे यांनी एक महत्वाचा इशारा सरकारला दिला आहे. सरकराने अध्यादेशबाबत कोणताही दगाबाजी केल्यास पुन्हा मुंबईला आलोच समजा असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

मोठी बातमी! मनोज जरांगेंनी 'मराठा आरक्षणा'ची लढाई जिंकली; रात्री नेमकं काय घडलं?