Manoj Jarange Beed: ज्याचं नाव सापडेल अशा मागेल त्या मराठ्याला आरक्षण  म्हटल्यावर पालकमंत्री धनंजय मुंडेंचे कानच टाईट झाले. असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) जोरदार हल्लाबोल केला. तसेच सरसकट मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची मागणी करत ओबीसींच्या पोटात दुखंल असं गिरीश महाजनांनी (Girish Mahajan) म्हंटल्याने सरसकट शब्दाला सगेसोयरे म्हटले, पण मागणी जुनीच आहे. असं म्हणत मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी बीडच्या सभेत सरसकट आरक्षणाची मागणी रेटली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी बीडमध्ये जमलेल्या लाखोंच्या मराठा समाजाला ते बोलत होते.


तुम्हाला बघून 100 हत्तींचे बळ..-मनोज जरांगे


यावेळी लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव एकत्र आले होते. आपल्याला लढाई जिंकायची आहे बरं...असं म्हणत कितीही संकट आली तरी मी हटत नाही. तुम्हाला बघितलं की माझ्या आता 100 हत्तींचं बळ येतं असं म्हणत मराठा बांधवांना मनोज जरांगेंनी भावनिक साद घातली. 


मागेल त्याला प्रमाणपत्र म्हटलं आणि धनंजय मुंडेंचे कान टाईट झाले


मागेल त्याला प्रमाणपत्र म्हटलं आणि धनंजय मुंडे यांचे कान टाईट झाले, असं म्हणत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मागेल त्या मराठ्याला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जोर लावून धरली. ज्याची नोंद सापडली अशा मागेल त्या मराठ्याला हे प्रमाणपत्र द्यायचं ही मागणी आज पासून सुरू झाल्याचं ते म्हणाले.


गिरीश महाजन म्हणाले म्हणून....


'धनंजय मुंडे म्हणाले मागेल त्याला म्हणजे सरसकट झालं, मग मी म्हटलं आम्हाला सरसकटच पाहिजे. याआधी गिरीश महाजन म्हणाले होते, 29 ऑगस्टपासून मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची आहे. सरसकट म्हटलं की ओबीसींच्या पोटात दुखंल, त्यामुळे तुम्ही दुसरा शब्द आणा. यावर मग सगेसोयऱ्यांना आरक्षण द्या असं आम्ही म्हणू लागलो असा गोप्यस्फोटही त्यांनी सभेत केला.


बीडमध्ये जरांगेंच्या सभेसाठी रेकॉर्डब्रेक गर्दी




मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला बीडमध्ये मोठी गर्दी झाली असून आत्तापर्यंतची एखाद्या रॅलीसाठी झालेली ही सर्वात मोठी रेकॉर्डब्रेक गर्दी असल्याचं बोललं जात आहे.








लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव मनोज जरांगे यांच्या रॅलीत सहभागी झाले असून तुफान गर्दीमुळे शहरातील सर्व रस्ते जाम झाले आहेत.आत्तापर्यंतच्या पाचही जिल्ह्यातील गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडणारी ही गर्दी असल्याचे सांगितले जात आहे. उपोषणकर्ते आणि शांतता रॅलीचे प्रमुख मनोज जरांगे यांनीही बीडमधील गर्दीवर भाष्य करताना बीडच्या जनतेचे आभार मानले आहेत. शांतता रॅलीला प्रत्येक जिल्ह्यात गर्दी झाली, मराठ्यांनी मराठ्यांच्या गर्दीचे रेकॉर्ड तोडले, असे जरांगे यांनी म्हटले.


 









हेही वाचा:


मनोज जरांगेच्या बीडमधील शांतता रॅलीसाठी रेकाॅर्ड ब्रेक गर्दी, सर्व रस्ते जाम; मराठा आरक्षणप्रश्नी जरांगे सभेत काय बोलणार?