Manoj Jarange Beed Rally: मनोज जरांगे पाटील यांची आज बीडमधून शांतता रॅली निघणार आहे. यासाठी लाखोंच्या संख्येने लोक सहभागी होताना दिसत असून या रॅलीत आता तुफान गर्दी झाली आहे. सर्व रस्ते जाम झाले आहेत. पाचही जिल्ह्यातील गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडणारी ही गर्दी असल्याचे सांगितले जात आहे. 


लोकसभेचा निकाल लागल्यापासून बीड जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. आज बीडच्या सभेत मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील काय बोलणार? त्यांच्या निशाणावर कोण असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


बीडमध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी 


मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये आज शांतता रॅली (Beed Maratha Reservation Rally) होत असून शहरात रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाल्याचे सांगितले जात आहे. लाखोंच्या संख्येने बीड शहरात मराठा बांधव येत असून पाचही जिल्ह्यातील सर्व गर्दीचे रेकॉर्ड मोडणारी ही गर्दी असल्याचे सांगण्यात येत आहे. 


पोलिसांचा कडक बंदोबस्त


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शहरात प्रचंड संख्येने मराठा बांधव येत आहेत. त्यामुळे शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच 5000 स्वयंसेवक ही मदतीला असणार आहेत.


मराठा समाजासह सगळे सोयऱ्यांनाही मराठा आरक्षण लागू करण्याचा अध्यादेश जारी करण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला 13 जुलैची मुदत दिली असून ते आठवडाभरासाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांची बीडमध्ये शांतता रॅली आहे.


शहरात रॅलीचा कसा राहणार मार्ग?


बीड शहरातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात होऊन माळी वेस, सुभाष रोड , अण्णाभाऊ साठे चौक ,जालना रोडमार्गे ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात येईल. येथे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत. या रॅलीची संयोजकांकडून पूर्ण तयारी झाली आहे.


 रॅलीची तयारी पूर्ण, चौकात भगवे झेंडे, बॅनर


शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व बाजूने भगवे झेंडे,बॅनर लागलेले आहेत. तसेच छोटे-मोठे मंडप घालण्यात आले असून तिथे पिण्याचे पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याच ठिकाणी रुग्णवाहिका तसेच इतर अत्यावश्यक सेवा ही उपलब्ध असणार आहे. स्वयंसेवकांसह पोलिस अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांना शिस्तीसाठी आवाहन करत आहेत.


नक्की कशी करण्यात आलीये व्यवस्था?


बीड शहरातील शांतता रॅलीसाठी 80 भोंगे बसवण्यात आले असून 800 स्वयंसेवक सज्ज आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी 12 रुग्णवाहिका असून त्यातील 4 कार्डियाक रुग्णवाहिका आहेत. घरासाठी 3500 पुरुष स्वयंसेवक व 1500 महिला स्वयंसेवक सज्ज असून 15 डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे.


हेही वाचा:


''मराठ्यांचे मतं घेईपर्यंत पुण्यात गोड बोलायचं''; खासदार कोल्हे अन् बजरंग सोनवणेंवर संतापले मनोज जरांगे