धुळे : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांच्या दळणवळणासाठी दुवा ठरणाऱ्या मनमाड-धुळे-इंदूर या 350 किमी रेल्वेमार्गाच्या कामाच्या पहिल्या टप्प्याचं भूमीपूजन मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होईल, अशी घोषणा संरक्षण राज्यमंत्री डॉ . सुभाष भामरे यांनी केली. ते धुळ्यात उज्ज्वला दिवस कार्यक्रमात बोलत होते.
धुळे ते नरडाणा हा भूमीपूजनाचा पहिला टप्पा असेल. मनमाड-धुळे-इंदूर या रेल्वेमार्गामुळे दिल्ली -कोलकाता हे अंतर 150 किमीने कमी होणार आहे. वेळ आणि पैशांची बचत होणार असल्याने प्रवासी, मालवाहू वाहतुकीसाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.
धुळे जिल्ह्यात 20 एप्रिल रोजी विविध ठिकाणी केंद्र सरकारच्या वतीने आयोजित उज्ज्वला दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते किमान 150 महिलांना गॅस कनेक्शनचं वाटप करण्यात आलं. यावेळी पेट्रोलियम कंपन्यांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाच्या कामाला मे महिन्यात सुरुवात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Apr 2018 03:19 PM (IST)
पहिल्या टप्प्याचं भूमीपूजन मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होईल, अशी घोषणा संरक्षण राज्यमंत्री डॉ . सुभाष भामरे यांनी केली. ते धुळ्यात उज्ज्वला दिवस कार्यक्रमात बोलत होते.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -