Manikrao Kokate News : राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि  माजी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. नाशिक पोलिसांचे पथक वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट निघाल्याप्रकरणी त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कोकाटे यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाल्यानंतर कोकाटे वांद्रे येथील लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. नाशिक पोलिसांची टीम ज्यामध्ये दहा हवालदार तीन अधिकारी अशा एकूण 13 जणांचे टीम कोकाटे यांना अटक करण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झाली आहे.

Continues below advertisement

माणिकराव कोकाटे यांना अटक करण्याच्या प्रोसेस सुरू करणार

दहा मिनिटांपूर्वी नाशिक पोलिसांची टीम मुलुंड टोल नाका क्रॉस करून मुंबईमध्ये दाखल झाली आहे. अर्धा तासांमध्ये नाशिक पोलीस वांद्रे येथील लीलावती रुग्णालयामध्ये दाखल होतील. माणिकराव कोकाटे यांना अटक करण्याच्या प्रोसेस सुरू करणार आहेत. 

तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन पोलिस पुढे कारवाईबाबत निर्णय घेणार

नाशिक पोलिसांकडून कारवाईपूर्वी कोकाटे यांचा सध्याचा वैद्यकिय अहवाल पाहून तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन पोलिस पुढे कारवाई करण्याबाबत निर्णय घेतील. शिवाय कारवाईपूर्वी नाशिक पोलिस वांद्रे पोलिसांना याबाबत कळवू शकतात. मात्र, न्यायालयाचे आदेश असल्याने मुंबई पोलिसांना कळवणे तसे बंधनकारक नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र कोकाटेंवर कारवाईपूर्वी वैद्यकिय अहवाल आणि तज्ञ डॉक्टरांच्या सल्यानुसार पुढील कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Continues below advertisement

माणिकराव कोकाटे कोणत्या प्रकरणामुळं अडचणीत? 

नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी कमी उत्पन्न दाखवत अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. या प्रकरणी फेब्रुवारी 2025 मध्ये माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. यावर माणिकराव कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयात अपिल केलं होतं. सत्र न्यायालयानं शिक्षा कायम ठेवली. माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील आमचे सहकारी श्री. माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोतोपरी आहेत,

महत्वाच्या बातम्या:

माणिकराव कोकाटेंवर अन्याय झाला, विखे पाटलांचं वक्तव्य, मंत्री संजय शिरसाठांचेही टोचले कान